Sudhir Mungantiwar, Nitesh Rane and Vijay Wadettiwar
Sudhir Mungantiwar, Nitesh Rane and Vijay WadettiwarSarkarnama

Mungantiwar On Rane : मुनगंटीवार राणेंना म्हणाले, गंभीर व्हा; वडेट्टीवारांनाही लगावला टोला!

Vijay Wadettiwar : डिसेंबरमध्ये महायुतीचं सरकार जाईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं.
Published on

Chandrapur Political News : हिवाळी अधिवेशनापर्यंत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार महायुतीचे मंत्री असतील, असे भाकीत नितेश राणेंनी केले होते. आता या मुद्द्यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नितेश राणे यांचे कान टोचले आहेत. राजकारण करत असताना गंभीर व्हायला हवं, असा सूचनावजा इशारा त्यांनी राणेंना दिला. (Vijay Vadettiwar had made a statement that the government will go in December)

डिसेंबरमध्ये महायुतीचं सरकार जाईल, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बहुतेक राणेंनी ते विधान केलं असावं, असं मुनगंटीवार म्हणाले. सरकार जाईल, असे विधान वडेट्टीवार वारंवार करत आहेत. त्यांची वक्तव्यं गंभीर नाहीत, असे सांगत त्यांनी वडेट्टीवारांनाही टोला लगावला.

येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे महायुतीचे मंत्री असतील, तशी चर्चा आमच्या महायुतीत सुरू असल्याचे नितेश राणे म्हणाले होते. राणेंच्या या विधानानंतर काँग्रेसच्या गोटात चर्चा सुरू झाली. दरम्यान, जे वारंवार पक्ष बदलतात, त्यांनी दुसऱ्यांच्या पक्षनिष्ठेबाबत उगाचच प्रश्नचिन्ह निर्माण करू नये, आपण काँग्रेसचे एकनिष्ठ शिपाई आहोत.

आधी नितेश राणेंनी मंत्री व्हावे, दुसऱ्याच्या मंत्री होण्याच्या वावड्या उठवू नयेत, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी राणेंना लगावला होता. आता या मुद्द्यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण करीत असताना गंभीर व्हायला हवं, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंनाही खडे बोल सुनावले आहे.

मुंडे टोकाचा निर्णय घेणार नाहीत...

पंकजा मुंडे सध्या पक्षावर कमालीच्या नाराज आहेत. आपल्याला ज्या पद्धतीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या भाजपला रामराम ठोकणार, अशी चर्चा सुरू झाली होती. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता, त्यांच्या विधानाचा गैरअर्थ काढण्यात आला.

भविष्यात आपणाला कोणताच टोकाचा निर्णय घेण्याची गरज पडू नये, यासाठी त्यांनी ईश्वराकडे प्रार्थना केली. कितीही अडचणी आल्या तरी त्याला सामोरे जाण्यासाठी आपणास ताकद द्यावी, असा त्याचा अर्थ होता. पंकजा मुंडे टोकाचा निर्णय घेणार नाहीत, असा पूर्ण विश्वास असल्याचेही मुनगंटीवारांनी सांगितले.

मुख्यमंत्री होण्याची मनीषा गैर नाही...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, यासाठी एकाने लालबागच्या राजाला पत्र लिहिलं. हे पत्र दानपेटीत सापडलं. याबाबत बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री होण्याची अनेकांची मनीषा असते. पण अजित पवारांबाबत हे पत्र लिहिल्याने त्याची बातमी झाली.

Edited By : Atul Mehere

Sudhir Mungantiwar, Nitesh Rane and Vijay Wadettiwar
Mungantiwar's Emotional News : मुनगंटीवार झाले भावुक; अन् मुख्यमंत्र्यांना म्हणाले, तात्काळ मार्ग काढावा लागेल !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com