Nana Patole on MVA : महाविकास आघाडीत बिघाडी अन् काँग्रेस एकाकी? ; नाना पटोलेंने स्पष्टच सांगितलं, म्हणाले....

Mahavikas Aghadi Politics News : शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित राहणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र काँग्रेसचे...
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Congress Nana Patole News : शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्यानंतर काँग्रेस एकटी पडली, आघाडीत बिघाडी निर्माण झाली, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्रित राहणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व वावड्या असल्याचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मला फोन आला असून मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात विधिमंडळ समित्यांसह सर्वच विषयावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय आधीच जाहीर केला आहे. तत्पूर्वी संजय राऊत(Sanjay Raut) यांनी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमुळे महाविकास आघाडीचा काही जागांवर पराभव झाला असल्याचा आरोप केला होता.

अनेक जागांवर उशिरापर्यंत निर्णय घेतला गेला नाही, शिवसेनेला विदर्भात जागा सोडण्यास काँग्रेसने नकार दिला तसेच ज्या मतदारसंघासाठी काँग्रेसने आग्रह धरला होते तेथे त्यांचे उमेदवार पराभूतसुद्धा झाल्याचे राऊत यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या वादामुळे आता आघाडीचे भवितव्य शिल्लक रहिले नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे दिल्लीतही उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) काँग्रेसऐवजी आम आदमी पार्टीला पाठिंबा जाहीर केला आहे. ही सर्व पार्श्वभूमी आणि वादविवाद सुरू असताना नाना पटोले यांनी आघाडी कायम असल्याचा दावा केला आहे, हे विशेष.

Mahavikas Aghadi
Mamata Banerjee on Sanjay Roy Punishment : संजय रॉयला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर ममता बॅनर्जी समाधानी नाहीत, म्हणाल्या...

आमच्यापेक्षा महायुतीतच अधिक वाद आहेत. खाते वाटप करायला वेळ लागला, त्यानंतर पालमंत्री नियुक्त करण्यासाठी तब्बल एक महिना विलंब झाला. आता त्यावरही अनेकजण सहमत नाही. दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना स्थगिती द्यावी लागली. एकीककडे मुख्यमंत्री १०० दिवसात रिझल्ट द्यायचे म्हणतात आणि दुसरीकडे ते दावोसला गेले असताना वाद उद्‍भवले असल्याचा टोलाही यावेळी नाना पटोले(Nana Patole) यांनी महायुतीला लगावला.

बदलापूरची घटना खऱ्या अर्थाने राज्याला काळिमा फासणारी होती. सरकारने पोसल्या भक्षकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे फिंगरप्रिट नसल्याचे समोर आले. या प्रकरणातील सगळे तथ्य पुढे आणून, आरोपीवर कारवाई व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi
Donald Trump Net Worth : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे किती संपत्ती, तुम्हाला माहीत आहे का?

तसेच, युवक काँग्रेस(Congress) तरुणांची संघटना आहे. पक्षात शिस्त असली पाहिजे याकरिता राष्ट्रीय पातळीवरून कारवाई करण्यात आली. नेमकी कारवाई काय झाली आणि कशामुळे हे मला माहित नसल्याचे प्रदेश युवक काँग्रेसने ६० पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्याच्या घटनेवर पटोलेंनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com