MVA News : नागपुरवरुन 'मविआ'त ठिणगी; हायकमांडकडे बोट दाखवत काँग्रेसने केले मोठं विधानं

Nagpur Political News : काँग्रेस हायकमांड म्हणाले तर नागपूर शहरातील सहाच्या सहाही विधानसभेच्या जागा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची तयारी काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी दाखवली आहे.
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Nana Patole, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज्यातील विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याची तयारी महाविकास आघाडी व महायुतीकडून जोरात सुरु आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा 21ऑगस्टला मुंबईत होणार होती. मात्र, ही चर्चा झाली नाही. त्यातच आता नागपूरमधील महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे.

शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नागपूर शहरातील पूर्व नागपूर या विधानसभा मतदारसंघावर दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने प्रतिउत्तर देताना मोठे विधान केले आहे. त्यामुळे येत्या काळात आघाडीतील घटक पक्षांत वाद रंगण्याची शक्यता आहे. (MVA News)

आम्ही नागपूर शहरातील एकही जागा आघाडीतील मित्र पक्षासाठी सोडणार नाही. 2019 साली विधानसभा निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघात काँग्रेसचा (Congress) उमेदवार फक्त 4 हजार मतांनी पराभूत झाला होता. त्यामुळे दक्षिण नागपूरवर आमचा नैसर्गिक दावा असल्याचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस हायकमांड म्हणाले तर नागपूर शहरातील सहाच्या सहाही विधानसभेच्या जागा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची तयारी काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी दाखवली आहे. नागपूरमधील जागावाटपावरून येत्या काळात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. याच मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Beed Assembly Election : बीड जिल्ह्यातील विधानसभेच्या हायप्रोफाइल लढती ठरणार लक्षवेधी

जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार

आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचे समजते. त्यानुसार आघाडीतील तीन पक्षाला विधानसभेच्या 96 : 96 : 96 या सूत्रानुसार जागावाटप करु शकते. महाविकास आघाडीत कोणीही लहान किंवा मोठा भाऊ नसणार, समान जागांवर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याचे समजते. त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, मविआतील नेत्यांमधील आपापसातील कुरबुरी जागावाटपाच्या चर्चेत अडथळा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 24 ऑगस्टचा महाराष्ट्र बंदनंतर जागा वाटपावर चर्चा होणार आहे.

Sharad Pawar, Nana Patole, Uddhav Thackeray
Ajit Pawar News : 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांच्या भडकलेलेल्या आंदोलनामागे नेमके कोण? अजित पवारांना भलतीच शंका; म्हणाले,...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com