Chandrashekhar Bawankule : एकदा संघ मुख्यालयातून येऊन फोटो पाहा! बावनकुळे यांचे खर्गेंना चॅलेंज

Chandrashekhar Bawankule Challenge Mallikarjun Kharge: विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा संविधानाचा विषय हाती घेतला आहे. त्यावर भाजप आणि काँग्रेसचे नेते आमनेसामने आले आहेत.
Chandrashekhar Bawankule, Mallikarjun Kharge
Chandrashekhar Bawankule, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपचे संविधान बदलण्याचे मनसुबे आहेत, ते आपल्या कार्यालयात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावत नाहीत, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला होता. त्याला प्रत्त्युतर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकदा संघ मुख्यालयात येऊन बघावे, असे आव्हान दिले आहे. 

खर्गे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, खर्गे मतांसाठी काहीही आरोप करतात. संघ मुख्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नाही, हे त्यांना कोणी सांगितले? ते संघ मुख्यालयात आले होते का? त्यांच्याकडे दुर्बीण आहे का, त्यातून संघ मुख्यालयात लावलेले फोटो त्यांना दिसतात, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule, Mallikarjun Kharge
Riteish Deshmukh: लाडक्या भावाच्या प्रचारात अभिनेत्याची झापुक झुपूक एन्ट्री: लातुरच्या सभेत 'लयभारी' डायलॉगबाजी

हवेत आरोप करण्यापेक्षा खर्गे यांनी एकदा संघ मुख्यालयात यावे, कोणाचे फोटो आहेत किंवा नाहीत हे बघावे, असे बावनकुळे म्हणाले. भाजप संविधानाला मानत नाही. सुधारणा आणि विकासाच्या नावाखाली त्यांना संविधानात बदल करायचे आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला त्यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. संविधानच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो ते आपल्या कार्यालयात लावत नाही, अशी टीका खर्गे यांनी केली होती.

महायुतीच्या लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध होता. ती बंद करावी यासाठी कोर्टात गेले. बहिणींना आमिष दाखवल्या जात असल्याचा त्यांचा आरोप होता. आता काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात महिलांना तीन हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन दिले आहे, असा टोला बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला लगावला.

Chandrashekhar Bawankule, Mallikarjun Kharge
Ghansawangi Assembly Constituency: राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली, त्यांचे जागतिक स्तरावर कौतुक

आमचे बजेट तयार आहे. त्यात लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये आणि वीज, पाणी, रस्ते यासाठी निधी आहे. केंद्राकडून आम्ही पैसा आणू, असा दावा बावनकुळे यांनी केला. महविकास आघाडीचा जाहीरनामा फसवा आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. विकास करणे हे काँग्रेसच्या रक्तातच नाही, अशी टीकाही बानवकुळे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com