Ghansawangi Assembly Constituency: राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली, त्यांचे जागतिक स्तरावर कौतुक

Global recognition for Rajesh Tope contributions as Health Minister: लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना महाराष्ट्रची निष्ठा काय असते हे ही कळेल.
Ghansawangi Assembly Constituency
Ghansawangi Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास जातीनिहाय जनगणना करण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी घनसावंगी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ बोलतांना दिले. कोरोना काळात आरोग्य मंत्री म्हणून राजेश टोपे यांनी जनतेची सेवा केली. त्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले, असेही शरद पवार म्हणाले.

ज्यावेळी देशाची लोकशाहीची निवडणूक होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिका मांडत होते. या भुमिकेतून शेतकर्‍यांचे प्रश्‍न, उद्योगांचे प्रश्‍न मांडण्याऐवजी त्यांना चारशे जागा पाहिजे होत्या. (Sharad Pawar) परंतू या चारशे जागा मिळण्यासाठी त्यांना संविधानात घटनेत बदल व छेडछाड करायची होती. परंतू कॉग्रेस,शिवसेनेसह देशातील सर्वच डाव्या पक्षाना सोबत घेऊन देशाच्या नावाने इंडिया आघाडी स्थापन करून त्यांना रोखण्यात यश मिळवले.

Ghansawangi Assembly Constituency
Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी तिघांचे प्रयत्न', शरद पवार परळीतून कडाडले

या इंडिया आघाडीला महाराष्ट्रात 48 पैकी 31 जागा मिळाल्या, तर त्यांना केवळ 17 जागा मिळाल्या. (Rajesh Tope) आता महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक येत असून या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तीन पक्ष राष्ट्रवादी, उबाठा, काँग्रेस, डावे पक्ष यांची महाविकास आघाडी स्थापन केली आणि सत्ता बदलायची आहे. यासाठी सर्वसमान्यांच्या संसारात बदल झाला पाहिजे. सामान्य माणसाचे जीवनमान त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम करायचे आहे.

Ghansawangi Assembly Constituency
Ghansawangi Assembly Constituency : कोरोना काळात उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून राजेश टोपे लढले..

विधानसभेच्या निवडणूकीत सामोरे जात असतांना आपल्यासमोर दुसरी शक्ती आहे. दुसर्‍या शक्तीकडे मोदींचा पाठिंबा आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. सत्तेच्या जोरावर तूम्हा लोकांना वेगळ्या ठिकाणी नेऊ शकतो, असा त्यांना विश्वास आहे. मात्र लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस कधी लोकं विसरणार नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना महाराष्ट्रची निष्ठा काय असते हे ही कळेल, असेही शरद पवार म्हणाले.

Ghansawangi Assembly Constituency
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा आश्वासनांचा पाऊस; 'पंचसूत्री' जाहीर

राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तर दुसरीकडे राज्यात 890 लैंगीक अत्याचाराच्या घटना घडल्या, महिला असुरक्षीत आहेत. राज्यात राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यांच्या कामाचे देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतूक झाले त्यामुळे त्यांनी जालन्याचे नाव मोठे केले.

Ghansawangi Assembly Constituency
Supreme Court On NCP Dispute : सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांच्या राष्ट्रवादीला दणका; पुढील 36 तासांत 'ती' जाहिरात द्या!

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यास लाडक्या बहिणीच्या योजनेचे 1500 चे तीन हजार रूपये करू, सुशीक्षीत बेरोजगारांना चार हजार रूपये बेरोजगारी भत्ता देवू, असे शरद पवार म्हणाले. यावेळी खासदार कल्याण काळे, फोजीया खॉन, राजेश टोपे, राजेश राठोड, उत्तमराव जानकर, भुषणसिंह राजे होळकर, मिलीद आवहड, विजय बोराडे, संदेश चव्हाण, निसार देशमुख, सुरेखा लहाने यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com