Maharashtra Assembly Winter Session : माथाडी कामगारांचा संप पुढे ढकलला; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संघटनांचा निर्णय

Maharashtra Assembly Winter Session Nagpur Mathadi Labor Strike Update : माथाडी कामगारांनी उद्या पुकारलेला संप स्थगित केला आहे....
Nagpur Assembly Session 2023
Nagpur Assembly Session 2023Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : माथाडी कामगारांनी उद्या पुकारलेला संप पुढे ढकलण्यात आला आहे. माथाडी अधिनियम सुधारणा विधेयक क्रमांक 34 मागे घेण्यासंदर्भात विविध माथाडी कामगार संघटनांनी उद्या 14 डिसेंबरला राज्यव्यापी संप पुरकारला होता.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आश्वसन मिळाल्यानंतर संप स्थगित करण्यात आला. संप पुढे ढकलण्यात आलेला आहे. रद्द केलेला नाही, असे माथाडी कामगारांच्या नेत्यांनी सांगितले.

Nagpur Assembly Session 2023
Nagpur Winter Session : वसतिगृह, आधार योजनेसह 22 मागण्यांवर सरकारकडून सहमती

का आहे माथाडी कामगारांचा विरोध?

महाराष्ट्र माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार आणि महाराष्ट्र खासगी सुरक्षारक्षक सुधारणा विधेयक 2023 विधिमंडळात सादर करण्यात आले. या विधेयकातील अनेक तरतुदी या माथाडी कामगारांना जाचक आणि बाकडा युनियनसाठी फायद्याच्या ठरत होत्या. यामुले माथाडी नेत्यांकडून या विधेयकाला विरोध झाला. हे विधेयक आता सभागृहाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुधारित माथाडी विधेयक हे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माथाडी कामगारांच्या जीवावर उठणार आहे, असा माथाडी कामगारांचा आरोप आहे. सरकार माथाडी संघटनांना गंभीरतेने घेत नव्हते. त्यामुळे संप पुकारण्यात आला होता, असे संघटनांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यानंतर माथाडी कामगारांचा संप तूर्त स्थगित करण्यात आला आहे, असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Nagpur Assembly Session 2023
Nagpur Winter Session : मंत्री अतुल सावे येताच मातंग समाज मोर्चा आक्रमक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com