Nagpur Winter Session : मंत्री अतुल सावे येताच मातंग समाज मोर्चा आक्रमक

Atul Sawe : पुण्याहून धडकलेल्या एक हजार आंदोलकांशी करणार होते चर्चा
Minister Atul Sawe at Matang Morcha.
Minister Atul Sawe at Matang Morcha.Sarkarnama
Published on
Updated on

Matang Community : पुण्यातून एक हजार कार्यकर्त्यांसह नागपूरच्या विधान भवनावर धडकलेला मातंग समाज व लहुजी शक्ती सेनेचा मोर्चा बुधवारी (ता. 13) त्यावेळी आक्रमक झाला, ज्यावेळी इतर मागास बहुजन कल्याण तथा गृहनिर्माण विभागाचे मंत्री अतुल सावे आंदोलकांना भेटण्यासाठी आलेत.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशना नागपूर येथे सुरू झाल्यानंतर दरवर्षी येथे शेकडो मोर्चे धडकतात. मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी असाच एक मोर्चा बुधवारी विधान भवनावर धडकला. पोलिसांनी नियमाप्रमाणे विधान भवनाकडे जाणाऱ्या मार्गावरील झिरो माइल्स चौकातील मोर्चा पॉइन्टवर आंदोलकांनी अडविलं.

Minister Atul Sawe at Matang Morcha.
Nagpur Winter Session : लोकसभेतील घटनेनंतर विधान भवनाची सुरक्षा वाढविली

विष्णू कसबे हे या मोर्चाचं नेतृत्व करीत होते. मोर्चा पॉइन्टवर आंदोलकांनी सरकारशी चर्चेची मागणी केली. त्यामुळं तेथे तैनात असलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती विधान भवनातील सुरक्षा प्रभारींना दिली. संबंधित अधिकाऱ्यांनी हा संदेश इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्यापर्यंत पोहोचविला. सावे यांच्या सांगण्यानुसार मंत्री देत असल्याचा निरोप कसबे यांना देण्यात आला.

ठरल्याप्रमाणे मंत्री अतुल सावे हे आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसह मोर्चा पॉइन्टवर पोहोचले. त्यावेळी मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला व घोषणाबाजीला सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळं मोर्चा पॉइन्टवर तैनात असलेले पोलिस गोंधळले. मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक व पोलिसांनी सावे यांना मार्ग काढून दिला. त्यामुळे ते कसबे यांच्यापर्यंत पोहोचू शकले. घोषणाबाजीमुळं व गर्दीमुळं मोर्चाच्या ठिकाणी चर्चा करणं शक्य नाही. त्यामुळं कसबे यांच्यासह पाच जणांच्या शिष्टमंडळाला विधान भवनात आणण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना सावे यांनी पोलिसांना केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कसबे यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्यानंतर परत जात असतानाही मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही मंत्र्यांच्या वाहनासमोर येत काहींनी घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाजूला करीत सावे यांच्या ताफ्यात वाट मोकळी करून दिली. बुधवारी दिव्यांगांचा मोर्चाही विधान भवनावर धडकला. त्यावेळीही मोर्चेकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले कठडे ओलांडण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेचाही मंगळवारी (ता. 12) विधान भवनावर मोर्चाने समारोप झाला. त्यावेळीही आंदोलन आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला होता. एरवी प्रचंड वर्दळ असणारा नागपुरातील ‘झिरो माइल्स’ चौक हिवाळी अधिवेशन काळात हा परिसर ‘हाय सेन्सेटिव्ह झोन’ असतो. विधान भवनाकडं येणारा प्रत्येक मोर्चा याच चौकात अडविला जातो. अनेकदा मार्चेकरी आक्रमक होतात. कठडे तोडण्याचा प्रयत्न करतात. प्रसंगी काही आंदोलक अधिक आक्रमक होत आत्मदहन वैगरेसारखे मार्ग पत्करतात. त्यामुळे पूर्णवेळ येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहावे लागते. त्याचमुळे अधिवेशन काळात या परिसरात सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचं मनुष्यबळ तैनात असतं.

Edited by : Prasannaa Jakate

Minister Atul Sawe at Matang Morcha.
Nagpur Winter Session : बुलढाणा रुग्णालयातील घोटाळ्याची नव्यानं चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com