

नागपूर ः आठवडाभरापासून देशभरातील विमानसेवा ठप्प पडली आहे. याचा फटका सर्वांना बसला आहे. शेकडो प्रवासी विमानतळावर अडकून पडले आहेत. यावरून विरोधकांच्यावतीने भाजपला दोष दिला जात आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरे यांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर यावरून टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे या विमानाने प्रवास करीत नाही असा टोला त्यांना लगावला होता. विस्कळीत झालेल्या विमान सेवेवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था सरकारच्यावतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी विशेष विमाने नागपूरमध्ये दाखल होणार आहेत.
आठ डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. रविवारी १४ डिसेंबरला अधिवेशनाची सांगता होणार आहे. आमदारांच्या परतीसाठी रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता एअर इंडियाने एका विशेष विमानाची व्यवस्था केली आहे. नागपूर ते मुंबई असा असा या विमानाचा प्रवास राहाणार आहे. या विमानाची तिकिटे आमदारांना ऑन लाइन बुक करावी लागणार आहे. विधानसभेच्या तालिका अध्यक्षांनी विधानसभेत या विशेष माहिती आमदारांनी दिली. ज्यांना रविवारी मुंबईला परत जायचे असले त्यांनी गैरसोय टाळण्यासाठी तिकिटे बुक करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी ५ वाजून ५५ मिनिटाने हे विमान नागपूरवरून उडणार आहे. या विशेष विमानामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या सात दिवसांच्या कालावधीवरून मोठी नाराजी व्यक्त केली जात होती. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक महिना अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीसुद्धा अधिवेशनाचा कालावधी वाढवा आणि नागपूर कराराचे पालन करा अशी मागणी केली होती. त्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा विरोध नाही असे उत्तर दिले होते. त्यावरून अधिवेशनाचा कालावधी वाढणार अशी चर्चा रंगली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.