Nagpur beer bar file signing : नागपूरच्या 'बार'मधील सरकारी फाईल महाराष्ट्रभर 'घुमली'; सही करणारा अधिकारी 'सार्वजनिक'

Nagpur Beer Bar File Signing Row PWD Officer Identified on CCTV After Congress Criticism : नागपूरमधील मनीषनगर परिसरातील एका बिअर बारमध्ये अधिकारी आणि कंत्राटदार सरकारी फाईलवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्याचा चेहरा अखेर 'सार्वजनिक' झाला आहे.
Nagpur beer bar file signing
Nagpur beer bar file signingSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या मनीषनगरमधील एका बिअर बारमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एक अधिकारी सरकारी फाईलवर सह्या करत असल्याचा हा व्हिडिओ होता. यात तिघे जण होते, पण ते नेमके कोण होते, याची माहिती समोर येत नव्हती.

सीसीव्हीटी व्हायरल होते. पण अधिकारी कोणत्या विभागाचा आहे अन् त्याचे नाव देखील घेतला जात नव्हते. या प्रकरणात काँग्रेसने यात उडी घेतली आणि सीसीटीव्ही काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडिओ ट्वि्ट केला. आता सीसीटीव्ही स्पष्टपणे समोर आला आहे. सीसीटीव्हीमधील अधिकारी हा 'सार्वजनिक' बांधकाम विभागातील असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

नागपूरच्या (Nagpur) बारमध्ये बसून सरकार फाईलवर पटापटा स्वाक्षऱ्या केल्या जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली अन् राजकीय चर्चेला तोंड फुटले. या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती एका टेबलवर बसलेल्या दिसतात अन त्यातील एक जण महाराष्ट्र सरकारच्या फाईलींवर सह्या करतो आहे.

टेबलवर बसलेल्या तिन्ही व्यक्ती फाईलींच्या गठ्ठ्यांसमोर बसून मद्य सेवक करताना दिसत आहे. हे तिघे जवळपास तासभर गप्पा मारतात, फाईलींवर सह्या झाल्यानंतर ते निघून जातात. या व्हिडिओवरून काँग्रेसने (Congress) भाजप महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी जोरदार निशाणा साधला होता. तर काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली होती.

Nagpur beer bar file signing
Shani Shingnapur Nitin Shete Death : 'शनैश्वर'च्या नितीन शेटे मृत्यूमागे वेगळच कारण? पोलिस अधीक्षक म्हणाले, 'बनावट अ‍ॅप प्रकरणात...'

विजय वडेट्टीवारांनी ‘ना जबाबदारी, ना भीती...दारूचा घोट, टेबलाखालून पैशाची नोट', असा टोला सरकारला लगावला. त्यांनी सरकारचा कुणालाच धाक उरलेला नाही. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचा निशाणा वडेट्टीवारांनी साधला होता. विरोधकांनी देखील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Nagpur beer bar file signing
Manikrao Kokate News : राजीनामा लिहिलेल्या कोकाटेंच्या आशा पुन्हा पल्लवित; अजितदादांच्या एका अटीने गेम फिरला

या व्हिडिओची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली. प्रशासनाला चौकशीचा आदेश दिला. ही चौकशी गोपनीय पद्धतीने सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून कोणीच काय बोलायला तयार नाही. मात्र आता हा व्हिडिओतील अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागातील असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या अधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com