BJP City President: नागपूर शहराध्यक्षपदासाठी आमदाराची फिल्डिंग, भाजप धोरण बदलणार काय?

MLA Pravin Datke News : विधान परिषदेनंतर ते आता मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांना अध्यक्ष करायचे असल्यास भाजपला आपले धोरण बदलावे लागणार आहे. नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे हे यापूर्वी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, पक्षाच्या नव्या धोरणामुळे आजी-माजी आमदारांची अडचण झाली आहे. हा नियम बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. काही शहरांना अपवाद म्हणून या नियमातून वगळावे, अशी मागणी केली जात असल्याचे समोर आले आहे.

रविंद्र चव्हाण सोमवारी (ता.28) नागपूरमध्ये येऊन गेले. प्रमुख पदाधिकारी व कोअर कमेटीसोबत त्यांनी चर्चा केली. नव्या अध्यक्षाच्या नावांची चाचपणी केली. 'घर चलो अभियान' या प्रमुख कार्यक्रमासाठी ते आले होते. नागपूर भाजप (BJP) शहराचा अध्यक्ष निवडण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर आणि अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर हे 3 किंवा 4 मे रोजी नागपूरला येणार असल्याचे समजते. तत्पूर्वी विद्यमान अध्यक्ष बंटी कुकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती बाल्या बोरकर आणि मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांची नावे शहर अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत.

BJP Flag
China Supports Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही चीनला पाकिस्तानचाच पुळका ; 'या' मागणीचे केले समर्थन!

सध्या बंटी कुकडे हे नागपूर (Nagpur) शहराचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अद्याप आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. हे लक्षात घेता त्यांनाच पुन्हा संधी देण्यात यावी अशी मागणीही केली जात आहे. ते 43 वर्षांचे आहेत. महापालिकेत दोन वेळा निवडून आले आहेत. महापालिकेच्या परिवहन समितीचे सभापती होती. भाजपच्या नव्या वयाच्या आणि आजी-माजी आमदारांच्या धोरणात ते एकदम फिट बसतात.

संजय भेंडे हे यापूर्वी शहराचे अध्यक्ष होते. मात्र, आता या पदासाठी इच्छुक नसल्याचे कळते. बाल्या बोरकर यांचे नाव एक गटामार्फत रेटले जात आहे. त्यांनीसुद्धा नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. प्रवीण दटके हे नागपूर शहराचे महापौर आणि भाजपचे शहराध्यक्ष होते.

BJP Flag
Abu Azmi : पहलगाममधील हल्ल्यानंंतर अबू आझमींचा गंभीर आरोप; म्हणाले,‘…म्हणून दहशतवाद्यांनी धर्म विचारला!’

विधान परिषदेनंतर ते आता मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांना अध्यक्ष करायचे असल्यास भाजपला आपले धोरण बदलावे लागणार आहे. नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष सुधाकर कोहळे हे यापूर्वी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. यावेळी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना भाजपने पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दिली होती. हे बघता नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com