Nagpur News : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच माजी मंत्री अनिस अहमद यांनी कालच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन विकास आघाडीत प्रवेश घेतला होता. मंगळवारी(ता.29) ते मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, एक मिनिट उशिर झाल्याने त्यांना अर्ज भरता आला नाही.
पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवणारे अहमद यांची वेळ चुकलीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांनी मुद्दामच वेळ चुकवल्याचे बोलले जात असून याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे. मात्र, याचा फटका भाजपला (BJP) बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ मुस्लिम आणि हलबा बहुल आहे. काँग्रेसने (Congress) मुस्लिमांना उमेदवारी द्यावी यासाठी आग्रह केला जात होता. मात्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. ते मागील निवडणुकीत अवघ्य चार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते.
यावरून मुस्लिम समाजात मोठी नाराजी होती. दुसरीकडे भाजपने हलबा समाजाची नाराजी ओढावून प्रवीण दटके यांना उमेदवारी दिली आहे. यात अनिस अहमद यांची उमेदवारी भाजपसाठी फायद्याची ठरेल असे बोलले जात होते.
दुसरीकडे हलबा समाजाचे प्रतिनिधत्व करणाऱ्या भाजपच्या बंडखोरांनी दावेदारी दाखल केली आहे. त्यांनी भाजपचे परंपरागत मते आपल्याकडे वळवल्यास भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनिस अहमद वंचित बहुजन आघाडीचे मध्य नागपूरचे अध्यक्ष बागडे यांच्यासह उमेदवारी दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते.
निवडणूक अधिकाऱ्यांनी पाच प्रतिनिधींना सोबत घेऊन ते जात होते. मात्र, त्यांना फक्त तिघांनाच प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. ही बातचीत सुरू असतानाच उमेदवारी दाखल करण्याची वेळ संपली असे सांगून आपल्या तोंडावर दार बंद केल्याचे अनिस अहमद यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर आपला अर्ज घ्यायला हवा होता. मात्र, तो नाकारून आपल्यावर अधिकाऱ्यांनी अन्याय केल्याचा आरोप अहमद यांचा आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.