Nagpur District News : राखेचा बंधारा फुटला, शेकडो एकर जमीनीवर राखमिश्रित पाणी, महाजेनकोवर रोष !

Nagpur : खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणाव राख बाहेर निघते.
Dam of Ashes, Nagpur.
Dam of Ashes, Nagpur.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Hundreds of acres of farmland were submerged in ash : नागपूर नजिक असलेल्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्राचा राख साठवणूक बंधारा अचानक फुटला. त्यामुळे शेकडो एकर शेतजमिन राखमिश्रीत पाण्याखाली आली आहे. शेतांवर राखेचे थर जमा झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (Crops have been severely damaged)

खापरखेडा वीज निर्मिती केंद्रातून मोठ्या प्रमाणाव राख बाहेर निघते. दररोज या राखेची विल्हेवाट लावली गेली पाहिजे. पण तसे केले जात नाही, तर ही राख खसाळा - म्हसाळा परिसरातील तयार करण्यात आलेल्या तलावात साठवून ठेवली जाते. काल (ता. १९) पहाटे हा बंधारा फुटला आणि राखेचे पाणी परिसरातील शेतांमध्ये शिरले. त्यामुळे शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकदा हे राखमिश्रीत पाणी शेतांमध्ये शिरले आणि राखेचा थर तयार झाला की, त्या जमिनीवर पुढचे पाच वर्ष पिक घेता येत नाही. कालच्या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाहता पाहता राखयुक्त पाण्याने हाहाकार उडवला. शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके अवघ्या काही तासांत नष्ट झाली, तर लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला.

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात मंगळवारी (ता. १८) जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी राखेच्या तलावात जमा झाले. त्यामुळे बंधारा फुटला आणि शेकडो हेक्टर जमीन राख मिश्रित पाण्याखाली आली. फुटलेल्या बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. महाजनेकोचे अधिकारी दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेऊन आहेत.

Dam of Ashes, Nagpur.
Nagpur ZP News : राज्याचा पॅटर्न जिल्हा परिषदेत राबवून केदार गटाला शह देण्याचा भाजपचा प्रयत्न !

ही काळजी आधीच घेतली गेली असती तर आज शेकडो एकर जमीन खराब होण्यापासून वाचली असती. या घटनेला महाजेनकोच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणी कारणीभूत आहे, असे वारेगावचे सरपंच कमलाकर बांगरे यांनी सांगितले. महाजेनकोने शेतकऱ्यांना (Farmers) एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

मागील वर्षी फुटला होता कोराडीचा बंधारा..

हा बंधारा कामठी तालुक्यात येतो. घटनेनंतर तहसीलदार चमूसह घटनास्थळी दाखल झाले आणि प्रभावित शेतांचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले. मागील वर्षी जुलै महि्न्यात कोराडी औष्णिक वीज केंद्राचा राख बंधारा फुटला होता. त्यावेळीही शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. महाजनेकोने गेल्या वर्षीच्या घटनेवरून बोध घेतला नाही. त्यामुळे कालची घटना घडली आणि शेतकऱ्यांचे (Farmers) अतोनात नुकसान झाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com