Nagpur Election: नागपूर महापालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेनं टाकला डाव! 'इतक्या' जागांवर केला दावा; काँग्रेस मान्यता देणार का?

Nagpur Election: महापालिका निवडणुकीत आता काँग्रेसच्या मान्यतेवरच महाविकास आघाडीचा निर्णय अवलंबून राहणार आहे.
Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT AllianceSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Election: महानगर पालिकेनंतर महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे बघून उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने बुधवारी तातडीने बैठक बोलावून महाविकास आघाडी की स्वबळ लढायचे यावर मत जाणून घेण्यात आले. वरिष्ठ पातळीवर आघाडीचा निर्णय झाल्यास नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत ३५ जागांवर दावा करण्याचा निर्णय पक्षाच्यावतीने घेण्यात आला. आता काँग्रेसच्या मान्यतेवरच महाविकास आघाडीचा निर्णय अवलंबून राहणार आहे.

Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या हरयाणातील मत चोरीच्या आरोपांचं निवडणूक आयोगाकडून पुन्हा खंडन; सांगितलं नेमकं काय झालंय?

मागील निवडणुकीत शिवसेनेचे दोन नगरसेवक निवडून आले होते. १७ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या मतदानात पाच टक्के वाढ झाली होती. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला. या निवडणुकीत काँग्रेसचे २९ तर भाजपचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतांची गोळाबेरीज केली असता सुमारे ६० ते ७० नगरसेवक निवडून येतात. याच आकडेवारीच्या भरवशावर आम्ही महाविकास आघाडीत ३५ जागा देण्याची मागणी करणार असल्याचे नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांनी सांगितले.

Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
Medha Kulkarni: राऊत, राणा यांच्यानंतर आता पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचीही प्रकृती अचानक बिघडली! नेमकं काय झालंय?

आजच्या बैठकीत स्वबळावर आणि आघाडीत लढावे असे दोन्ही बाजूने मत व्यक्त करण्यात आले. स्वबळावर लढल्यास शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व कायम राहील असा दावा अनेकांनी केला. दुसरीकडे काहींनी व्यावहारिक निर्णय घेण्याची सूचना केली. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतविभजनात भाजपला फायदा होतो. मागील निवडणुकीच्या निकालाची मतांची आकडेवारीची गोळाबेरीज केल्यास भाजपला रोखता येणे सहज शक्य असल्याचा दावा करण्यात आला. चार सदस्यांचा प्रभाग असल्याने आघाडीने एकत्र लढल्यास अधिक फायदा होईल असेही मत अनेकांनी या बैठकीत नोंदवले. कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूने व्यक्त केलेली मते आणि मागणीचा अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर केला जाईल. स्थानिकांना अधिकार देण्यात आले असले तरी आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होण्याची शक्यता आहे. जो निर्णय होईल आणि पक्षाच जो आदेश येईल त्यानुसार आमची लढायची तयारी असल्याचे सतीश हरडे यांनी सांगितले.

Nagpur Municipal Election Congress Shiv Sena UBT Alliance
MNS: "अतिरेक्याना जात-धर्म नसतो तसा बोगस मतदारालाही जात-धर्म नसतो"; मनसेनं आशिष शेलारांना जोरदार प्रत्युत्तर

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि उबाठाचे संपर्क प्रमुख सतीश हरडे यांच्यात याविषयी प्राथमिक चर्चासुद्धा झाली आहे. ठाकरे यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते. नागपूर शहरात ३८ प्रभाग असून १०५ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. या बैठकीत नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख सतीश हरडे, जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांचा प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सुरेश साखरे, सागर डबरासे, किशोर पराते, नितीन तिवारी, किशोर ठाकरे, मीनाताई अडकाणे, शशिधर तिवारी, राजेश कनोजिया आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हरडे यांनी शाखा प्रमुख, प्रभाग प्रमुख, बूथ प्रमुखांसह सर्व रिक्त जागा भरण्याचे आणि स्थानिक समस्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा आदेश यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com