Nagpur drug trafficking case : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलगा प्रताप, ड्रग्ज तस्करीत सापडला; निवडणुकीच्या तोंडावर कोंडी!

Nagpur BJP Ex-Corporator Ajay Buggewar Son Arrested in Drug Trafficking Case : भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
Ajay Buggewar
Ajay BuggewarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur police drug bust : नागपूर शहरात सर्वत्र एमडी विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येते. पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रवीण दटके आणि परिणय फुके यांनी याकडे महायुती सरकारचे लक्ष वेधले.

एमडीच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्याची जोरदार मागणी दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कली आहे. यातच भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडीची विक्री करताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

चारचाकी वाहनातून एमडीची तस्करी करणाऱ्या माजी नगरसेवकाच्या मुलगा संकेत अजय बुग्गेवार याला अटक केली आहे. अजय बुग्गेवार हे काही वर्षांपूर्वी भाजपचे (BJP) नगरसेवक होते. त्याचे तिकीट कापल्याने बंडखोरी केली होती. पराभूत झाल्यानंतर अजय बुग्गेवार परत भाजपात परतले आहेत.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ पोलिसांना परिसरात एक युवक एमडी तस्करीसाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता. संकेत बुग्गेवार (MH45-AV4554) एसयूव्ही कारने एमडी ड्रग्जची डिलिव्हरी देण्यासाठी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या खिशातून 1 लाख 67 हजार 700 रुपयांचे 16.7 ग्रॅम एमडी पावडरचे चार पाऊच आढळून आले.

Ajay Buggewar
Ahilyanagar municipal elections : निवडणुकीच्या तयारी लागा; सदस्य संख्या आरक्षणासह निश्चित, प्रभाग रचना ठरवणार राजकीय अस्तित्व

संकेत बुग्गेवार याला ताब्यात घेत, विचारणा केली असता, प्रणय बाजारे याच्याकडून हे एमडी आणल्याची माहिती दिली. सुरवातीला त्याने आपण नगरसेवक अजय बुग्गेवार याचा मुलगा असल्याचे सांगून पोलिसांना दम देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचे काही ऐकूण घेतले नाही. यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

Ajay Buggewar
Nimisha Priya's execution : मोदी सरकार सुप्रीम कोर्टात हतबल; निमिषा प्रिया यांचा जीव वाचविण्यासाठी केवळ 'ब्लड मनी'चा पर्याय...

अजय बुग्गेवार पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करीत होता. आता त्याच्या मुलाला एमडीची तस्करी करताना अटक झाली असल्याने त्याची चांगलीच नामुष्की झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com