Nagpur News: कोर्टाचा एकाचवेळी भाजप आमदार दटके अन् काँग्रेसच्या ठाकरेंना मोठा दणका; दिले 'हे' निर्देश

BJP And Coongress MLA : भाजप आमदार प्रवीण दटके यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे इम्रान कुरेशी आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे प्रतिस्पर्धी ॲड. प्रीतम खंडाते यांनी ईव्हीएमशी छेडछाड तसेच बोगस मतदान केल्याने याचिका दाखल केली आहे.
Pravin Datke And Vikas Thakre .jpg
Pravin Datke And Vikas Thakre .jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. प्रचारसभेतील आचारसंहितेचा भंग: भाजपा आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यावर निवडणुकीदरम्यान बोगस मतदान, गोंधळ घालणे आणि ईव्हीएम रोखण्याचे आरोप झाले आहेत.

  2. न्यायालयीन समन्स: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दोन्ही आमदारांना समन्स बजावत आठ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

  3. सदस्यत्व रद्द करण्याची मागणी: विरोधी उमेदवारांनी निवडणूक आचारसंहितेच्या भंगाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची सदस्यता रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

Nagpur News : भाजपचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके व काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठाने समन्स बजावला आहे. त्यांना आठ आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही आमदारांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांच्या विरोधात निवडून लढणाऱ्या उमेदवारांनी केली आहे. (Mumbai High Court's Nagpur Bench issues summons to BJP's Pravin Datke and Congress's Vikas Thakre over alleged election code violations, including bogus voting and EVM tampering)

मतदानाच्या दिवशी दोन्ही आमदारांनी अनेक मतदान केंद्रावर गोंधळ घातला, बोगस मतदान केले, मतदान आटोपल्यानंतर स्टँग रूममध्ये ईव्हीएम घेऊन जाणारे वाहन रोखल्याचा आरोप त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी केला आहे.

भाजप (BJP) आमदार प्रवीण दटके यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणारे इम्रान कुरेशी आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे प्रतिस्पर्धी ॲड. प्रीतम खंडाते यांनी ईव्हीएमशी छेडछाड तसेच बोगस मतदान केल्याने याचिका दाखल केली आहे. मोहम्मद इम्रान कुरेशी यांच्या याचिकेनुसार, सायंकाळी साधारण सात वाजता ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे वाहन जाणारे वाहन रोखल्याचा आरोप केला आहे.

ईव्हीम मशीन घेऊन जाणारे वाहन रोखणे हा निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग असल्याचे त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी याचिकाकर्ते नागपूरच्या कोतवाली पोलिस स्टेशनला गेले आणि दोन्ही पक्षांविरोधात तक्रार दाखल करण्याची विनंती केली, परंतु पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला.

Pravin Datke And Vikas Thakre .jpg
Rajabhau Waje Politics: रेल्वेमंत्री वैष्णव यांनी घेतली राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेची दखल!

याचबरोबर, याचिकाकर्त्यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही ही तक्रार दिली होती. मात्र, ईव्हीएम असलेले वाहन पोलिस अधिकाऱ्याने निवडणूक अधिकाऱ्यांना सुपूर्द न करता पोलिस स्टेशनमधून गायब केले.

याविरोधात याचिकाकर्त्याने यापूर्वी रिट याचिका दाखल केली होती, जी निवडणूक याचिका दाखल करण्याचे निर्देश देऊन रद्द करण्यात आली. त्यानुसार, याचिकाकर्त्याने निवडणूक याचिका दाखल करून आमदार प्रवीण दटके यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.

Pravin Datke And Vikas Thakre .jpg
Rohit Pawar: कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कसा मिळाला? रोहित पवारांचा मोठा खुलासा

तसेच खंडाते यांनी सुद्धा आरोप करीत ठाकरे यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती केली. प्रकरणावर न्यायाधीश अभय मंत्री यांनी आमदारांना समन्स बजावला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सात महिन्यांचा कार्यकाळ उलटला आहे.

  1. प्रश्न: प्रकरण कोणत्या न्यायालयात सुरू आहे?
    उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सुरू आहे.

  2. प्रश्न: कोणत्या आमदारांवर आरोप करण्यात आले आहेत?
    उत्तर: भाजपा आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांच्यावर आरोप आहेत.

  3. प्रश्न: मुख्य आरोप नेमके काय आहेत?
    उत्तर: बोगस मतदान, ईव्हीएम वाहन रोखणे आणि आचारसंहितेचा भंग हे आरोप आहेत.

  4. प्रश्न: न्यायालयाने आमदारांना काय आदेश दिले?
    उत्तर: आठ आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com