Rohit Pawar: कोकाटेंचा रम्मी खेळतानाचा व्हिडिओ कसा मिळाला? रोहित पवारांचा मोठा खुलासा

Manikrao Kokate Rummy Video : विधानसभा अधिवेशनादरम्यान सभागृहाच कामकाज सुरू असताना हा व्हिडिओ नेमका कोणी काढला? हा सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate Rummy Video : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात कामकाज सुरु असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रम्मी हा पत्त्यांचा खेळ खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळं गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगलाच गोंधळ सुरु आहे. कोकाटेंच्या राजीनाम्याची देखील मागणी विरोधकांकडून केली जात आहे. पण हा व्हिडिओ नेमका काढला कोणी? आणि तो आमदार रोहित पवारांकडं आला कसा? हा सर्वांना पडलेला प्रश्न होता. त्यावर आता खुद्द रोहित पवारांनीच खुलासा केला आहे.

Rohit Pawar
Manikrao Kokate Politics: भास्कर जाधव यांचा गंभीर आरोप, माणिकराव कोकाटे यांनाच कृषी खाते नको असावे!

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, "अधिवेशनात शेतकऱ्याबाबत दूधाच्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे हे रम्मी किंवा पत्ते खेळत असताना आपण सर्वांनीच पाहिलं आहे. हा व्हिडिओ कोणी काढला याबाबतचा तपास विधानसभा अध्यक्ष जलद गतीनं करत आहेत. एका पेन ड्राईव्हच्या माध्यमातून तो व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला त्यानंतर त्या पेन ड्राईव्हमधून तो व्हिडिओ मी माझ्या मोबाईलवर घेतला आणि त्यानंतर मी तो सोशल मीडियावर पोस्ट केला. तो माझ्यापर्यंत कोणी पोहोचवला हे बघावं लागेल. मात्र, आता त्याचा तपास विधानसभा अध्यक्ष करत आहेत त्यामुळं तो व्यक्ती समोर येईल.

Rohit Pawar
Honey Trap Case : प्रफुल्ल लोढांचा मुलगा म्हणतो गिरीश महाजन आमचे दैवत, षडयंत्र तर खडसेंचे अन्..

तपासामध्ये व्हिडिओ काढणारा जो कोणी व्यक्ती सापडेल त्याचा आम्ही सत्कार करणार आहोत. तसंच महाराष्ट्रातील जनता देखील त्या व्यक्तीचा सत्कार करेल. मात्र, ज्या जलद गतीनं या प्रकरणांमध्ये तपास कार्य सुरु आहे. संतोष देशमुख, ज्ञानेश्वरी मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय न्यायासाठी वाट पाहत आहेत. त्यांच्या केसचा तपास वेगाने होताना पाहायला मिळत नाही. मात्र, माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ कोणी काढला? याबाबतचा तपास मात्र विधानसभा अध्यक्ष वेगाने करत आहेत. त्यामागे सरकारचा काय उद्देश असेल? हे सर्वांनाच माहिती आहे, असा खोचक सवालही यावेळी रोहित पवार यांनी केला आहे.

Rohit Pawar
मोठी बातमी : चीन सीमेजवळ प्रवासी विमान कोसळलं : उड्डाण करताच संपर्क तुटला, जगाची धाकधूक वाढली

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर रम्मी प्रकरणाचा वेगवान तपास करत असून हा व्हिडिओ सत्ताधारी पक्षातीलच कोणीतरी काढला की गॅलरीमधून हा व्हिडिओ काढण्यात आला, याबाबतचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com