Nagpur IIIT student suicide : धक्कादायक! तोंडात कापड, नाकात च्युइंगम, हातांच्या नसा कापल्या; नवव्या मजल्यावरून विद्यार्थ्याची उडी

Kolhapur student studying at IIIT Nagpur dies after jumping from the 9th floor of hostel building; incident shocks campus : नागपूर इथल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'मधील विद्यार्थ्याने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन यात्रा संपलवी.
Nagpur IIIT student suicide
Nagpur IIIT student suicideSarkarnama
Published on
Updated on

Nagpur education news : परीक्षेच्या काही तास आधी, 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी'मध्ये (IIIT) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने धक्कादायक पद्धतीने आत्महत्या केली. हा विद्यार्थी कोल्हापूरचा असून श्रेयस माने असे त्याचे नाव आहे.

परीक्षाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पण त्याने ज्यापद्धतीने आत्महत्या केली, त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. IIIT नागपूरकडून याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नसल्याने कॅम्पसमधील विद्यार्थी संतप्त आहेत. पोलिसांनी या घटनेचा शोध सुरू केला आहे.

नागपूरच्या (Nagpur) 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' (IIIT) मधील श्रेयस माने हा तो कॉम्प्युटर सायन्स स्पेशलायझेशनच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो परीक्षेमुळे तणावात होता. सोमवारपासून त्याची चौथ्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. मात्र, परीक्षेच्या काही तास आधीच, त्याने सोमवारी पहाटे वसतिगृह या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला.

श्रेयस याने खूप टोकाचे पाऊल उचलले. त्याने ज्यापद्धतीने स्वतःचे जीवन संपवले, ते पाहून पोलिस (Police) देखील चक्रावले. त्याने तोंडात कापड कोंबून, त्यावर चिकट टेप लावला. नाकात च्युइंगम टाकले. दोन्ही हाताच्या नसा कापल्या आणि त्यानंतकर नवव्या मजल्यावरून उडील घेतली. उडी मारताना ओरडता येऊ नये म्हणून, त्याने हा प्रकार केल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur IIIT student suicide
Akshay Kardile Record Victory : अक्षय कर्डिलेंचा मतांबरोबर मताधिक्याचा विक्रम; वडिलांनाच टाकलं मागं, 2029च्या आमदारकीला असणार चॅलेंज?

श्रेयस हा वसतिगृहात चौथ्या मजल्यावर राहात होता. पण तो नवव्या मजल्यावर जात उडी घेतली. त्याच्या या प्रकाराने वसतिगृहातील इतर विद्यार्थी हादरले आहेत. श्रेयस काही दिवसांपासून तणावात होता. परीक्षेच्या टेन्शनमध्ये होता. पहिल्या वर्षेच्या काही पेपरमध्ये नापास झाला होता. ते बॅक पेपर राहिले असतानाच, द्वितीय वर्षाचे पेपर सुरू झाले. यातील देखील काही पेपरला तो बसला नव्हता.

Nagpur IIIT student suicide
Devendra Fadnavis phone Call : देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोन अन् खेळ पलटला! राहुरी निवडणुकीचा खरा 'टर्निंग पॉइंट' उघड!

यातून तो दिवसेंदिवस एकटाच तणावात राहात होता. सोमवारी परीक्षेच्या काही तास अगोदर, त्याने टोकाचे पाऊल उचलले अन् शैक्षणिक क्षेत्र हादरवून सोडले. नागपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. श्रेयसच्या उडी घेण्यामागील कारणांचे पोलिस शोध घेत आहेत.

दरम्यान, श्रेयस याच्या मृत्यूनंतर IIIT नागपूर कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन केलं. या घटनेला काही प्रमाणात संस्था देखील जबाबदार आहे. याचा तीव्र निषेध विद्यार्थ्यांनी नोंदवला. IIIT प्रशासनाकडून याबाबत कोणताही खुलासा समोर आलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com