Congress , BJP
Congress , BJP Sarkarnama

Congress vs BJP : भाजपचा प्रचार करतो म्हणून तरूणाचं अपहरण करून बेदम मारहाण, नगर परिषद निवडणुकीला गालबोट

Nagpur Kalmeshware Election Clash : रविवारी रात्री अकरा वाजता कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये आरिफ आणि हरिश ग्वालबंशी समोरासमोर आले. यावेळी ग्वालबंशी यांनी आरिफला तू नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचं काम का करत नाही, भाजप उमेदवाराला का साथ देतो असा जाब विचारला.
Published on

Nagpur News, 25 Nov : राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराचा धडका सुरू आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी तर पायाला भिंगरी बांधली आहे. उमेदवारांकडून मतदारांना अनेक आश्वासन दिली जात आहे. मात्र, आता याच निवडणुकीच्या प्रचाराला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

नागपुरातील कळमेश्वर नगरपरिषदेसाठी काँग्रेस उमेदवाराचा काम का करत नाही असा जाब विचारत एका व्यक्तीला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. नागपूरातील काँग्रेसचे नेते आणि महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकाऱ्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे.

नेमकं काय घडलं?

कळमेश्वर नगरपरिषदेत काँग्रेस उमेदवाराचे काम का करत नाही भाजपला साथ का देतो? असा जाब विचारात आरिफ लतीफ शेख नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेस नेते माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांनी त्यांच्या सहकाऱ्याच्या मदतीने मारहाण केली. या प्रकरणी आरिफने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत.

Congress , BJP
Palghar News : संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्या रस्त्यात सोडलं; अवघ्या 2 दिवसांच्या बाळाला घेऊन मातेची जंगलातून पायपीट

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीवर अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजता कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये आरिफ आणि हरिश ग्वालबंशी समोरासमोर आले.

Congress , BJP
Mahayuti Politics : मंत्री मुश्रीफांना चंद्रकांत पाटलांचा दम, थेट तिजोरीचा मालक काढत ठणकावलं

यावेळी ग्वालबंशी यांनी आरिफला तू नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचं काम का करत नाही, भाजप उमेदवाराला का साथ देतो असा जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये काही वाद झाल्या त्यांनतर हरिश ग्वालबंशी यांच्या सोबत असलेल्या लोकांनी आरिफचे अपहरण केले आणि त्याला गोरेवाडा परिसरात नेऊन गंभीर मारहाण केली.

त्यानंतर रात्री उशिरा जखमी आरिफला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आरिफने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी काँग्रेस नेते हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला होता. सध्या तिघांना अटक केली आहे. मात्र, हरीश ग्वालबंशी अद्याप फरार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com