Nagpur Lok Sabha Election : 'गडकरींची उमेदवारी रद्द करा'; आचारसंहिता भंग केल्याची काँग्रेसची तक्रार...

LOk Sabha Election 2024 : या गंभीर गुन्ह्यासाठी नितीन गडकरी यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरातून मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या निवडणूक प्रचाराच्या कामासाठी शाळकरी विद्यार्थ्यांची वापर केल्याचा आरोप गडकरींवर करत आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार काँग्रेसकडून नोंदवण्यात आली आहे. (Nagpur Lok Sabha Election 2024)

काय आहे काँग्रेसचा आरोप -

काँग्रेने निवडणूक आयोगाकडे तक्रारीत म्हटले आहे की, नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर केला गेला आहे. 1 एप्रिलला भर मध्यान्ही रणरणत्या उन्हात वैशाली नगर परिसरात विद्यार्थ्यांना प्रचारासाठी हातात भाजपचे झेंडे आणि बॅनर देऊन उभे केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitin Gadkari
Praniti Shinde Vs BJP : भाजपवाले आता माझं चारित्र्यहनन करतील; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

हे सर्व विद्यार्थी नागपूर येथील एनएसव्हीएम शाळेतील आहेत. यामुळे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि भाजपाविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करण्यात यावा. या गंभीर गुन्ह्यासाठी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची उमेदवारीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली गेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लेखी स्वरुपात ही तक्रार दाखल केली आहे.

Nitin Gadkari
NCP Political Crisis News : अजित पवार गटाकडून आदेशाचे पालन नाही! सुप्रीम कोर्टात याचिका

लोंढे काय म्हणाले?

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीसाठी भाजपकडून करण्यात आलेल्या प्रचारामध्ये आचारसंहितेचे उल्लंघन मी निदर्शनास आणण्यासाठी मी ही तक्रार करत आहे. भाजप आणि त्यांचे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आचारसंहितेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. निवडणूक आयोगा आचारससंहितेत लहान मुलांना प्रचारात सहभागी करण्यास मनाई केली आहे, असे स्पष्ट असतानाही भाजपकडून लहान मुलांचा प्रचारासाठी वापर केला गेला, असे लोंढे तक्रारीत म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com