Nitin Gadkari : नितीन गडकरींच्या हॅटट्रिकपेक्षा लीडकडे अधिक लक्ष, धाकधुक वाढणार!

Nitin Gadkari Vs Vikas Thackeray : नितीन गडकरी तीन लाखांच्या मताधिक्यांनी नागपूरमधून सलग चार वेळ निवडूण आलेले विलास मुत्तेमवार यांना पराभूत केले होते.
 Vikas Thackeray Nitin Gadkari
Vikas Thackeray Nitin Gadkari sarkarnama

राजेश चरपे

Nagpur Loksabha : लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ते पाच लाखांच्या लीडने निवडून येणार असा दावा केला होता. या दाव्यात सत्यता देखील वाटत होती. मात्र यंदा गडकरी यांच्या हॅटट्रिक पेक्षा त्यांना लीड किती मिळणार याच्याच चर्चा आहेत.

नितीन गडकरींना 2014 च्या निवडणुकीत साडेतीन लाखांचे मताधिक्य मिळाले होते. त्यांच्या विकासकामांमुळे यंदा त्यांचे मताधिक्य वाढणार असाच अंदाज होता. मात्र, मतदानामध्ये घसरलेली टक्केवार आणि विकास ठाकरे यांनी दिलेली लढत त्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, नितीन गडकरी यांचा विजया अंदाज वर्तवला जातो आहे. त्यामुळे गडकरींच्या हॅटट्रिकपेक्षा लीडकडे अधिक लक्ष

नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी पहिल्या निवडणुकीत तीन लाखांच्या मताधिक्यांनी निवडूण आले होते. त्यावेळी त्यांनी माजी केंद्रीयमंत्री, नागपूरमधून सलग चार वेळ निवडूण आलेले विलास मुत्तेमवार यांना पराभूत केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व काँग्रेस Congress कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला होता. तसेच भाजपलाही एवढ्या मताधिक्यांनी गडकरी निवडूण येतील असे वाटत नव्हते. नागपूरचे राजकीय समीकरणात गडकरी फिट बसत नव्हते.

ओबीसी, मुस्लिम, अनुसुचित जातींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने गडकरी इतक फरकाने सहज निवडूण येथील याची अपेक्षा कोणालच नव्हती.2019 मध्ये पाच वर्षांचा कार्यकाळात केलेली कामे, रस्त्यांचे विणलेले जाळे त्यामुळे गडकरीचे यांचे मताधिक्य वाढत जाणार, असे अंदाज बांधला जात होता.

त्यांच्या विरोधात कोणी लढायला तयार नव्हते. निवडणुकीपूर्वी तत्कालीन भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांचे मोदी यांच्यासोबत बिनसले. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. थेट राहुल गांधी यांच्या सभेत जाऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

 Vikas Thackeray Nitin Gadkari
Ramtek Lok Sabha Constituency : चंद्रशेखर बावनकुळे की सुनील केदार, कोण ठरणार रामटेकचे किंगमेकर?

राहूल गांधी यांनी त्यांना गडकरी यांच्या विरोधात लढण्यासाठी नागपूरला पाठवले. गडकरी यांच्यासमोर ते टिकणार नाही असे वाटत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात मते घेतली. मागील निवडणुकीतील गडकरी यांचे मताधिक्य कमी केले. गडकरी दोन लाख 16 हजारांच्या मताधिक्याने निवडूण आले. गडकरी यांच्या विरोधात लढल्याने पटोले यांचे पक्षात वजन वाढले. विधानसभेत ते निवडूण आले. विधानसभेचे अध्यक्ष झाले.

पुढे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांनी सुरुवातीलाच नागपूरमधून गडकरी यांच्या विरोधात लढणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे नागपूरसाठी उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. पश्चिम नागपूरचे आमदार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली.

ठाकरे माजी महापौर असून लढवय्या नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सहा लाखांच्या आसपास मतदार असलेल्या कुणबी समाजाचे ते प्रतिधित्व करतात. ठाकरे यांनी तोडीची लढत दिली असल्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ठाकरे यांनी आपण एक लाखांच्या मताधिक्याने निवडूण येणार असल्याचा दावा केला आहे. शहरात फक्त 54 टक्के मतदान झाले आहे. हे बघता गडकरी यांना पाच लाखांचे मताधिक्य कसे मिळणार हे सध्या कोडेच आहे.

 Vikas Thackeray Nitin Gadkari
Sanjay Deshmukh ON Lok Sabha Result: निकालापूर्वीच ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजयाची शंभर टक्के गॅरंटी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com