Congress on Gadkari : गडकरींच्या प्रचारात मोठी चूक ?, अतुल लोंढे यांचा गडकरींच्या विरोधात आक्रमक पवित्रा !

Model code of Conduct : सर्व कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरींकडून आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
Atul Londhe, Nitin Gadkari
Atul Londhe, Nitin GadkariSarkarnama

Nagpur Loksabha Election 2024 : भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचारसंहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊन नितीन गडकरी व भाजपवर कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप केला आहे. निवडणुकीसंदर्भातील कार्यक्रमात लहान मुलांचा वापर करू नये, असे निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश असतानाही भारतीय जनता पक्ष व उमेदवार नितीन गडकरी यांनी त्यांच्या प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केला आहे. दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी NSVM फुलवारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान वैशालीनगर भागात गडकरींच्या प्रचार रॅलीत शाळकरी मुलांना सहभागी केले होते. हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर असून, अत्यंत गंभीर प्रकार आहे. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Atul Londhe, Nitin Gadkari
Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवारीबाबत छगन भुजबळ निश्चिंत, समर्थकांचे आहेत 'हे' डावपेच!

शाळकरी मुलांना राजकीय प्रचारासाठी वापर केल्याबद्दल या शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित करावे. राजकीय प्रचारासाठी लहान मुलांचा वापर करणे, हे बाल कामगार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन तर आहेच, तसेच मुंबई उच्च न्यायालयाने 2014 मध्ये दिलेल्या आदेशाचेही उल्लंघन आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, असेही लोंढे म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या आधी एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणाले होते की, “मी लोकसभा निवडणुकीत चहापाणी करणार नाही, पोस्टर लावणार नाही, बॅनर लावणार नाही, मते द्यायची असतील तर द्या नाहीतर देऊ नका” परंतु निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र गडकरी यांना नागपूरच्या गल्लीबोळात फिरावे लागत आहेत, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

भाजप नेते नितीन गडकरी यांच्या प्रचाराने काँग्रेस नेते वैफल्यग्रस्त झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे मनात येईल तसे आरोप काँग्रेस नेते करत सुटले आहेत. नितीन गडकरी यांच्या विजयाचे गणित सुनिश्चित असताना काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने आरोप करण्यात येत असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. नितीन गडकरी हे अतिशय सूज्ञ राजकारणी असून, प्रचारात लहान मुलांचा समावेश त्यांच्याद्वारे होणे कदापि शक्य नसल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. देशात नितीन गडकरी यांच्या कामाची स्तुती देशातील सर्व खासदारांनी केली आहे. त्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचादेखील समावेश होता. असे असताना नितीन गडकरी यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वावर आरोप करणे हे चुकीचे असून, त्याला कुठलाही आधार नसल्याचे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले. अतुल लोंढे यांच्या खोट्या आरोपांवर काय प्रतिक्रिया द्यायची, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले.

R

Atul Londhe, Nitin Gadkari
Rohit Pawar News : "भाजप उमेदवारीसाठी रोहित पवार फडणवीसांकडे विनवण्या करत होते"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com