Shiv Sena News : आमदाराने शिवसेनेला घातले खड्ड्यात, भाजपच्या इशाऱ्यावर नाचतात! शिवसैनिकांचे बंडाचे निशाण...

Nagpur seat sharing dispute : आमदार कृपाल तुमाने व इतर पदाधिकारी बैठक सोडून निघून गेले. त्यामुळे युती तुटल्यात जमा झाली होती. फक्त आशिष जयस्वाल बैठकीत थांबले.
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

BJP Shiv Sena conflict : नागपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली तर फक्त दोनच जागा शिवसैनिकांच्या वाट्याला आल्या आहेत. त्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. फक्त दोनच जागा घ्यायच्या होत्या तर युती कशाला केली असा सवाल शिवसैनिकांचा आहे. यापैकी दोघांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचे निशाण फडकावले आहे. सर्वांचा रोष अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर आहे.

भाजपने सुरुवातीला १२ जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आठ जागा देऊ असे सांगण्यात आले. त्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या घरी झाली. शिवसेनेसाठी सोडण्यात येणाऱ्या आठ पैकी सहा जागांवर आमचे उमेदवार लढतील अशी अट टाकली. एवढेच नव्हे तर भाजप दोन एसटी, दोन एससी, एक ओबीसी आणि दोन खुल्या प्रवर्गातील जागा देण्याचे भाजपनेच परस्पर ठरवले, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

शिवसेनेने मागितलेल्या जागेची दखलच घेतली नाही. शिवसेनेसाठी सोडण्यात आलेल्या दोन जागा दक्षिण नागपूर तर सहा जागा या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. ज्या जागा निवडून येण्याची शक्यता नाही त्या शिवसेनेसाठी सोडल्या. दक्षिण नागपुरातील एका जागेवर भाजपचे आपल्याच माजी नगरसेविकेचे नाव घुसडले. प्रभाग ३१मधील एक जागा संघाच्या कार्यकर्त्याला दिली.

Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde news : अखेर भाजपने एकनाथ शिंदेंना ‘आरसा’ दाखविलाच, हा इशारा समजायचा की एक घाव दोन तुकडे..?

प्रस्ताव पाहून सेनेचे नेते नाराज झाले. आमदार कृपाल तुमाने व इतर पदाधिकारी बैठक सोडून निघून गेले. त्यामुळे युती तुटल्यात जमा झाली होती. फक्त आशिष जयस्वाल बैठकीत थांबले. त्यांच्याकडे पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आले होते. माजी नगरसेवक बंडू तळवेकर हे त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या मुलीला तिकीट देण्यात आले. या एक जागेसाठी जयस्वाल यांनी भाजपच्या सर्व अटी मान्य केल्या आणि शिवसेनेला खड्ड्यात घातल्याचा संताप शिवसैनिकांनी व्यक्त केला.

Eknath Shinde Shiv Sena
Mahayuti News : हा अपमान मी सहन करणार नाही! केंद्रीय मंत्री महायुतीवर प्रचंड संतापले, आज घेणार मोठा निर्णय...

तत्पूर्वी, युती होण्याची शक्यता नसल्याने शिवसेनेने स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. उमेदवारही निश्चित केले होते. शिवसेनेकडे ५० उमेदवार लढण्यास तयार होते. भाजपने तिकीट कापलेले अनेक उमेदवार शिवसेनेच्या संपर्कात होते. मात्र आशिष जयस्वाल यांनी या सर्व तयारीवर पाणी फेरले. ते फक्त देहाने शिवसेनेत आहेत. भाजपच्या इशाऱ्यावरच नाचतात, असा आरोप शिवसैनिकांचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com