Eknath Shinde news : अखेर भाजपने एकनाथ शिंदेंना ‘आरसा’ दाखविलाच, हा इशारा समजायचा की एक घाव दोन तुकडे..?

BJP Shinde Shiv Sena seat sharing : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तुलनेने ठाकरेंची ताकद कमी झाली होती.
EKnath shinde, Devendra Fadnavis
EKnath shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

BJP Shinde Shiv Sena seat sharing : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातही सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती महायुतीतील जागावाटपाची. निवडणुकीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाऊ, असे स्पष्ट केले होते. पण बहुतेक ठिकाणी महायुतीचे तुकडे पडले आहेत. जागावाटपात भाजपने प्रत्येक ठिकाणी ‘मोठा भाऊ’ म्हणून आपली ताकद दाखवून देत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला माघार घेण्यास भाग पाडल्याचे चित्र आहे.

भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबई महापालिकेतही भाजपने आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. भाजप मुंबईत १३७ जागा व शिवसेना ९० जागांवर लढणार असल्याचे काल स्पष्ट झाले. सुरूवातीला शिवसेनेकडून १२५ पर्यंतच्या जागांची मागणी केल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात शिवसेनेला १०० चा आकडाही गाठता आलेला नाही. मुंबईत युतीमध्ये प्रत्येकवेळी शिवसेनाच वरचढ ठरली होती.

२००७ आणि २०१२ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. दोन्हीवेळी शिवसेनेचा मोठा भाऊ होती. पण २०१७ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. यावेळी भाजपने शिवसेनेला पाठिंबा देत त्यांचा महापौर बसविला. त्यावेळीही शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली होती. पण यावेळी पहिल्यांदाच मुंबईत शिवसेनेला नमते घ्यावे लागल्याचे दिसते.

EKnath shinde, Devendra Fadnavis
Mahayuti News : हा अपमान मी सहन करणार नाही! केंद्रीय मंत्री महायुतीवर प्रचंड संतापले, आज घेणार मोठा निर्णय...

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तुलनेने ठाकरेंची ताकद कमी झाली होती. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जवळपास १५० हून अधिक जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. शिंदे यांना मात्र केवळ ९० जागांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आले. आता प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांना माघार घ्यावी लागल्याचे स्पष्टपणे दिसते.

भाजपने एकप्रकारे एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेची ताकद कमी झाल्याचे दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना त्यावर भाष्य केले आहे. भाजपने फेकलेल्या तिकीटांवर शिंदे गटाला उमेदवार उभे करावे लागणार असल्याचा घणाघात राऊतांनी केला आहे. ही प्रतिक्रिया बोलकी आहे. कारण पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह अन्य काही महापालिकांमध्ये कमी जागा मिळत असल्याने शिवसेनेने युती तोडली आहे. अपेक्षेपेक्षा कमी जागा देत भाजपकडून बोळवण केली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. अनेकठिकाणी ही नाराजी उफाळून आली आहे.

EKnath shinde, Devendra Fadnavis
BJP NMC Election : महाजनांकडून आमदार फरांदे, हिरेंना जोरदार दणका; वाजतगाजत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की

भाजपची ही रणनीती महापालिका निवडणुकीसाठी नव्हे तर आधीपासूनच तयारी असल्याचे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीपासूनच महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे भाजपने दाखवून दिले होते. पुढे विधानसभा, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीतही दिसत आहे. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ही तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. ही निवडणूक महायुतीतून नव्हे तर स्वतंत्रपणे लढण्याची भाजपची रणनीती आहे. काही नेत्यांकडून हे बोलूनही दाखविण्यात आले आहे. त्यामुळे आतापासूनच युतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला तसेच सूचक संकेत दिले जात आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com