BJP Politics : फडणवीसांना नागपुरात मोठं गिफ्ट मिळणार? भाजपचं टार्गेट ठरलं, तयारीही जोमात...

BJP strategy Nagpur corporation : नागपूर महापालिका पंधरा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. दोन वेळा भाजपला अपक्ष नगरसेवकांच्या कुबड्या घेऊन सत्ता आणावी लागली होती.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याने नागपूरमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना यावेळी नागपूर महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत ऐतिहासिक विजयाची नोंद करायची आहे. याकरिता अतिशय बारकाईने नियोजन केले जात आहे. पक्षांतर्गत रचनेत बदल केला जाणार आहे. त्यानुसार 20 मंडळ समित्या स्थापन करून त्यांच्याकडे प्रत्येकी दोन प्रभागांची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

नागपूर महापालिका पंधरा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. दोन वेळा भाजपला अपक्ष नगरसेवकांच्या कुबड्या घेऊन सत्ता आणावी लागली होती. मात्र, मागच्यावेळी भाजपचे तब्बल 108 नगरसेवक निवडून आले होते. सध्या नागपूर महापालिकेत 151 नगरसेवक आहेत. यापैकी काँग्रेस 28, बसपा 10, राष्ट्रवादी एक, शिवसेना दोन आणि दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले होते.

Devendra Fadnavis
Raj Thackeray News : महाराष्ट्रात राहू द्यायचं का, यावर विचार करावा लागेल! राज ठाकरेंच्या नेत्यांकडून निर्वाणीचा इशारा

भाजपने आता दीडशे नगरसेवक निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना जागाच मिळू नये असा प्रयत्न केला जात आहे. याकरिता संघटनेची काटेकोर बांधणी केली जात आहे. भाजपच्या संघटनेनुसार विधानसभा निहाय मंडळ आहेत. त्यानुसार नागपूर शहरात सहा मंडळे आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने एकूण 20 मंडळ समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक मंडळावर दोन प्रभागांची जबाबदारी सोपविली जाणार आहे. मंडळ समितीत दोन 2 महामंत्री, एक संपर्क प्रमुख, एक कोषाध्यक्षाचा समावेश राहणार आहे. प्रत्येक मंडळ समिती व त्या अंतर्गत येणाऱ्या कार्यकर्त्यांना सरासरी 100 बुथ सांभाळावे लागणार आहेत. महापालिकेत उमेदवारी वाटप करताना मंडळ समितीच्या पदाधिकाऱ्यांचाही विचार केला जाणार आहे.

Devendra Fadnavis
Raj Thackeray News : महाराष्ट्रात राहू द्यायचं का, यावर विचार करावा लागेल! राज ठाकरेंच्या नेत्यांकडून निर्वाणीचा इशारा

महाविकास आघाडीच्या कार्यकाळात संभाव्य वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन नगरसेवकांची संख्या सहाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यास कोर्टात आव्हान देण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नव्याने केली जाणारी प्रभाग रचनेची तयारीसुद्धा बंद झाली होती.

आता सध्या भाजप महायुतीचे राज्यात सरकार आहे. ओबीसी आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्याने प्रभाग रचनेचा आणि नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा अधिकारही राज्य शासनाला राहणार आहे. त्यामुळे नागपूर पालिकेतील नगरसेवकांचा आकडा 151 च्या पुढे जाऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com