Nagpur Politics : सांगा प्रभागांची रचना का बदलली? नागपूर महापालिकेत राजकारण तापलं

Nagpur Municipal Corporation politics : नागपूर मनपा निवडणूकीसाठी महापालिका प्रशासनाने 23 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली होती. या प्रभाग रचनेवर भाजपने समाधान तर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
Nagpur mahapalika.jpg
Nagpur mahapalika.jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्य प्रभाग रचनेच्या प्रारुपावर माजी नगरसेवकांनी घेतलेल्या आक्षेपांवर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. यापैकी काही बदल आवश्यक असल्याचे सांगून राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने नियुक्त केलेले सनदी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी नागपूर (Nagpur) महापालिका प्रशासनाला स्पष्टीकरण मागितल्याने काही सुधारणा केल्या जाणार असल्याचे संकेत दिले. असे असले तरी सुनावणीत न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ इशारा काही आक्षेपकर्त्यांनी दिला आहे.

नागपूर मनपा निवडणूकीसाठी महापालिका प्रशासनाने 23 ऑगस्ट रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली होती. या प्रभाग रचनेवर भाजपने समाधान तर कॉंग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 23 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवण्यात आल्या. त्यानुसार मनपाकडे 115 आक्षेप नोंदविण्यात आले होते. या आक्षेपांवर मंगळवारी मनपा मुख्यालयात हर्डीकर यांनी सुनावणी घेतली.

प्रभाग 28 चे माजी नगरसेवक पिंटू झलके यांनी त्यांच्या प्रभागातील दिघोरी आणि वाठोडा या क्षेत्रांच्या सीमा वेगवेगळ्या करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर वाठोडा येथील 50 घरांमधील 200 मतदारांना प्रभाग 28 मध्ये टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर ग्रामीणमध्ये येणाऱ्या बहादुरा भागाला दिघोरीमध्ये समाविष्ट करून प्रभाग 28 मध्ये नव्याने जोडण्यात आल्याबाबत आक्षेप नोंदविला होता. त्यावर सुनावणीत हर्डीकर यांनी झलकेंचे मुद्दे ऐकूण घेत त्यामध्ये आवश्‍यक ते बदल करण्याबाबत आश्‍वस्त केले.

याशिवाय भाजपचे (BJP) माजी शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या प्रभाग 26 वर सर्वाधिक 11 च्यावर आक्षेप होते. त्यांनी प्रभाग 26 चा समावेश नेहरूनगर झोनमध्ये येत असताना लकडगंजमध्ये येणाऱ्या अब्बुमियानगरसह काही वस्त्या या प्रभागाला जोडण्यात आल्याचे सांगितले. त्या पूर्वीप्रमाणे प्रभाग क्रमांक 23 मध्ये जोडण्यात यावा अशी भूमिका मांडली. त्यांनाही हर्डीकर यांनी आवश्‍य ते बदल करण्याबाबत आश्‍वस्त केले.

Nagpur mahapalika.jpg
VP Election Result : एनडीएचा उमेदवार जिंकल्यानंतर काही मिनिटांतच भाजपनं राहुल गांधींना डिवचलं; म्हणाले,' तुमचे तर जनतेसोबत नेतेही...'

प्रभाग 8 मधील भाजप कार्यकर्ते रशीद शेख यांनी सात ते आठ मतदान केंद्र प्रभाग 19 मध्ये समाविष्ट केल्याबाबत आक्षेप नोंदवला. एआयएमआयएम नेते जावेद अख्तर यांनी प्रभाग 8 मधील मोमिनपुरा-नालसाब चौक या भागाचा प्रभाग 19 मध्ये जाणीवपूर्वक समावेश केल्याचा आरोप केला. बसपाचे सुबोध साखरे आणि भाजपचे दीपक अरोरा यांनीही नैसर्गिक मुख्य रस्त्यांऐवजी अंतर्गत रस्त्यांवरून प्रभागांचे तुकडे केल्याबद्दल टीका केली.

भाजपचेच माजी नगरसेवक अविनाश ठाकरे यांनी शिवणगावातील नागरिकांचे पुनर्वसन मिहान पुनर्वसन वस्तीत झाले असून हा भाग भौगोलिकदृष्ट्या प्रभाग 35 अंतर्गत येत असल्याकडे लक्ष वेधले. परंतु शिवणगाव वस्तीचा उल्लेख प्रभाग 38 मध्ये केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्रभाग 35 मध्ये शिवणगाव पुनर्वसन हा उल्लेख करण्यात यावा, अशी दुरुस्ती त्यांनी सुचविली.

Nagpur mahapalika.jpg
Nepal Political Crisis: नेपाळमध्ये Gen Zचं तांडव! उपपंतप्रधानांना, अर्थमंत्र्यांना पळवून पळवून मारलं; आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या डीएसपीची केली हत्या

याशिवाय इतरही आक्षेपकर्त्यांनी आपले मुद्दे मांडले. सर्व मुद्दे ऐकूण घेत हर्डीकर यांनी आवश्यक त्या बाबींची नोंद घेत त्यावर निर्णयाची प्रक्रिया करण्याची ग्वाही आक्षेपकर्त्यांना दिली. आलेल्या 115 आक्षेपांपैकी हद्द बदल बाबत 60, मतदार यादी व विधानसभानिहाय प्रभाग रचना करण्याबाबत 16, व्याप्तीतील नावाबाबत 25, तर आरक्षणाबाबत 7 आक्षेप प्राप्त झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com