VP Election Result : एनडीएचा उमेदवार जिंकल्यानंतर काही मिनिटांतच भाजपनं राहुल गांधींना डिवचलं; म्हणाले,' तुमचे तर जनतेसोबत नेतेही...'

Vice President election reaction : एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीनं प्रतिष्ठेच्या केलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना पाहायला मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातून कोणाला मताधिक्क्य मिळणार याबाबतही मोठी उत्सुकता शिगेला पोहचली होती.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक रंगतदार अवस्थेत पार पडली. या निवडणुकीत एनडीए आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांनी 152 मतांनी विजय मिळवला. तर विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला. पण या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालात एनडीएनं विजय मिळवताच भाजपचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबेंनी विरोधकांना पहिला तिखट वार केला आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबेंनी (Nishikant Dubey ) मंगळवारी (ता.09) ट्विट करत विरोधकांच्या इंडिया आघाडीला डिवचलं आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, तुम्हांला फक्त 300 मते मिळाली, पण असे कोणते 15 जण आहे, ज्यांनी पळून जाऊन आम्हाला अर्थात एनडीएला उमेदवाराला मतदान केलं? असा सवालही केला.

तसेच नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाला, पण विरोधकांचे तुकडे झाले, विरोधकांची 15 मते आमच्या एनडीए उमेदवाराला गेली आणि विरोधकांच्या 15 जणांनी त्यांची मते वाया घालवली. राहुल गांधींची (Rahul Gandhi) एकता संपली का? तसे @RahulGandhi जी, उपराष्ट्रपती ईव्हीएमने नव्हे तर मतपत्रिकेने निवडले गेले,असा टोलाही लगावला.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीकडे लोकसभा आणि राज्यसभेतील मिळून 315 खासदारांचे संख्याबळ होते. या 100 टक्के खासदारांनी मतदान केले होते. विरोधकांनी शंभर टक्के मतदान केल्याने हा एकप्रकारे विक्रम असल्याची चर्चा होती.

Rahul Gandhi, Narendra Modi
Vice President Election: NDA ची बाजी, सी. पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीला पराभवाचा धक्का

पण या विक्रमाचा बी. सुदर्शन रेड्डी यांच्या विजयासाठी फायदा होऊ शकला नाही. त्यातही 315 पैकी रेड्डी यांना 300 मते मिळाली. त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीची 15 मते फुटल्याचे समोर आले आहे.

एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीनं प्रतिष्ठेच्या केलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना पाहायला मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातून कोणाला मताधिक्क्य मिळणार याबाबतही मोठी उत्सुकता शिगेला पोहचली होती.

Rahul Gandhi, Narendra Modi
Rohit Pawar criticism on Devendra Fadnavis : मुख्यमंत्री क्रेडिट घेण्याच्या नादात, मित्रपक्षांना..; रोहित पवारांनी भाजपच्या प्लॅनवरच ठेवलं बोट

लोकसभा व राज्यसभेतील एकूण 781 खासदार मतदार आहेत. त्यापैकी बिजू जनता दल, भारत राष्ट्र समिती आणि शिरोमणी अकाली दलाने उपराष्ट्रपती पदाच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे प्रत्यक्ष 767 खासदारांनी मतदान केले.

त्यातील 752 मते पात्र तर 15 मते अपात्र ठरली. त्यानंतर विजयासाठी 377 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मतमोजणीमध्ये सी.पी. राधाकृष्णन यांना पहिल्या क्रमांकाची 452 मते मिळाली. तर बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com