NCP News : भाजपच्या लाटेत शरद पवारांचा शहराध्यक्ष पराभूत; अजितदादांच्या राष्ट्रवादीचीही निराशजनक कामगिरी

Nagpur Municipal Election : नागपूर महापालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे पराभूत झाले, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार विजयी ठरला, भाजपने वर्चस्व कायम राखले.
BJP leader Balya Borkar celebrates victory over NCP city president Duneshwar Pethe in Nagpur municipal ward, marking a major setback for Sharad Pawar’s faction during civic polls.
BJP leader Balya Borkar celebrates victory over NCP city president Duneshwar Pethe in Nagpur municipal ward, marking a major setback for Sharad Pawar’s faction during civic polls.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना विधानसभेनंतर महापालिकेच्या निवडणुकीतही पराभवाचा धक्का बसला आहे. मागील महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ते एकमेव निवडून आलेले उमेदवार होते. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व परिवहन समितीचे माजी सभापती भाजपच्या बाल्या बोरकर यांनी यावेळी त्यांना पराभवाचा धक्का दिला आहे.

प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे बोरकर यांनी राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांच्यात थेट लढत झाली. मागील निवडणुकीत दोघेही वेगवेगळ्या गटातून लढले होते. आपसात लढण्याचे दोघांनी टाळले होते. या प्रभागातील तीन भाजपचे व एक राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता.

यावेळी आरक्षणामुळे दोघांवर एकाच गटात लढण्याची वेळ आली होती. यात भाजपच्या बोरकर यांनी बाजी मारली. यापूर्वी बोरकर यांनी काँग्रेसच्या महापौर नरेश गावंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक निवडून आला होता. यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आभा पांडे निवडून आल्या आहोत.

BJP leader Balya Borkar celebrates victory over NCP city president Duneshwar Pethe in Nagpur municipal ward, marking a major setback for Sharad Pawar’s faction during civic polls.
Vidarbha Mahanagarpalika Elections Result Live : नागपूरसह अकोल्यात भाजपची सत्ता, चंद्रपुरात काँग्रेसची बाजी, अमरावतीत काँटे की टक्कर

त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) महापालिकेत एकचे संख्याबळ कायम राहणार आहे. पांडे या मागील निवडणुकीत अपक्ष निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत दुनेश्वर पेठे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते.

BJP leader Balya Borkar celebrates victory over NCP city president Duneshwar Pethe in Nagpur municipal ward, marking a major setback for Sharad Pawar’s faction during civic polls.
PMC Election News : अजित पवारांच्या शहराध्यक्षांसह शिंदे सेना अन् शरद पवारांच्या पक्षातील दिग्गजांना पराभवाचा धक्का!

यात दोघांचाही पराभव झाला. भाजपचे (BJP) पालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळी लढली होती. अजित दादांच्या राष्ट्रवादीने 87 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 78 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने काही ठिकाणी एकमेकांना समर्थन जाहीर केले होते. त्याचाही काही फायदा पेठे यांना झाला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com