Nagpur Politics : जिंकू किंवा हारू पण वेगळे लढू! नागपूरच्या निर्धार मेळाव्यात एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?

Nagpur Municipal Election : महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याचीच चिंता सर्व शिवसैनिकांना लागली आहे. नागपूरमध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 108 नगरसेवक आहेत. महायुती झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फार काही जागा येणार नाहीत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 23 Sep : महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही याचीच चिंता सर्व शिवसैनिकांना लागली आहे. नागपूरमध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे 108 नगरसेवक आहेत. महायुती झाल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला फार काही जागा येणार नाहीत.

हे बघता महायुतीपेक्षा स्वबळावरच लढावे असा आग्रह शिवसैनिकांचा आहे. बुधवारी (ता.24) शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निर्धार मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. या मेळाव्यातून शिंदे महायुतीबाबत काय संकेत देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याप्रमाणे नागपूर महापालिकेतही भाजप शिवसेनेची युती होती. 2007 च्या निवडणुकीत शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले होते. तेव्हा भाजपला सत्ता स्थापायला पाच मतांची गरज होती. शिवसेनेमुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली. त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आले होते.

Eknath Shinde
Shivsena UBT Politics: शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते म्हणतात, नाशिकला पालकमंत्री नसने हे तर संशयास्पद!

2017 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. मात्र चार सदस्यांच्या प्रभागात शिवसैनिकांचा निभाव लागला नाही. त्यांचे फक्त दोन नगरसेवक निवडून आले होते. हे दोन्ही नगरसेवक सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. भाजपसोबतच्या युतीमुळे शिवसेनेची ताकद कमी झाली. युतीत वागणूक आणि किरकोळ जागा सोडल्या जात असल्याने शिवसेनेची ताकद कमी झाल्याचा आरोप शिवसैनिकांचा आहे.

बाळासाहेब ठाकरे असताना नागपूरमध्ये दोन विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडले जायचे. पूर्व आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा होता. मात्र हळूहळू भाजपने दोन्ही मतदारसंघ हिसकावून घेतले. भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि नेत्यांमधील भांडणात शिवसेनेचा बळी देण्यात आला.

पूर्वमध्ये जिंकण्याची शक्यता असताना दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ देऊन शिवसेनेला संपवण्यात आले. त्यानंतर युतीही तोडली. राज्यात युती कायम ठेवा. मात्र महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा. जास्तीत जास्त पराभव होईल मात्र शिवसेना आणि शिवसैनिक जिवंत ठेवावी अशी मागणी होत आहे.

Eknath Shinde
Kolhapur Politics : शिवसेनेचा आटापिटा, भाजपचा खटाटोप अन् राष्ट्रवादीचे तोंडावर बोट : जागावाटपावरून गणित फिस्कटणार?

नागपूरमधील 10 प्रभागांमध्ये शिवसेनेची ताकद आहे. चाळीस नगरसेवक निवडून येण्याची क्षमता आहे. अनेक माजी नगरसेवक शिवसेनेत येण्यास उत्सुक आहेत. यात उबाठा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच नव्हे तर भाजपच्याही काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

यापैकी अनेकांना मागील निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने डावलले होते. काहीजण नेत्यांच्या बंडखोरीमुळे पराभूत झाले होते. ते संधीच्या शोधात आहेत. मात्र, युती झाल्यास आमचे काय होईल याच एका कारणामुळे ते थांबले आहेत. असे किमान 25 नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचा दावा एका पदाधिकाऱ्याने केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com