NDCC Loan waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; पण, घोटाळ्यात अडकलेल्या नागपूर जिल्हा बँकेच्या कर्जदारांचे काय होणार?

Chandrashekhar Bawankule : राज्याच्या कर्जमाफी घोषणेनंतर नागपूर एनडीसीसी बँकेच्या घोटाळ्यामुळे येथील कर्जदार शेतकरी संभ्रमात. पडताळणीनंतरच पात्रतेवर निर्णय होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
Farmers at Nagpur District Central Cooperative Bank amid uncertainty over inclusion in Maharashtra’s upcoming loan waiver scheme.
Farmers at Nagpur District Central Cooperative Bank amid uncertainty over inclusion in Maharashtra’s upcoming loan waiver scheme.sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर : येत्या जून महिन्यात राज्य शासनामार्फत शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार आहे. आगामी अर्थसंकल्पात यासाठी आर्थिक तरदूत केली जाणार आहे. तसा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कर्जमाफीसाठी विविध बँकांकडून थकबाकीची आकडेवारी मागवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनाही कागतपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज उचलणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपूर जिल्हा सहकार बँकेत 1200 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. याच बँकेतील घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेची निवडणूक लढता आली नाही. या बँकेवर सध्या प्रशासक आहे. असे असले तरी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फतच सर्वाधिक कृषी कर्जाचे वाटप केले जाते. गावखेड्यातील शेतकऱ्यांना हीच एकमेव बँक ठाऊक आहे.

सहकार खात्याने अनेकांना लुबाडले आहे. नागपूर जिल्ह्य बँकेत झालेला घोटाळा बघता कर्जमाफी देताना याचा विचार केला जाणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. हे बघता आता या बँकेतून कृषी कर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, सहकार कायद्यावर बोट ठेवून अनेक शेतकऱ्यांची पिळवणूक झाली आहे.

Farmers at Nagpur District Central Cooperative Bank amid uncertainty over inclusion in Maharashtra’s upcoming loan waiver scheme.
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी खूश खबर! कर्जमाफीसाठी सरकारच्या हालचाली, बँकांकडे मागितली माहिती

गरजवंत शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे हे सरकारचे धोरण आहे. एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करू नये यासाठी कर्जमाफी दिली जाणार आहे. यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्यांकडून याद्या मागवत आहोत. सोबतच सहकार खात्याकडून कोणी लुटले गेले आहे याचीही पडताळणी केली जात आहे.

Farmers at Nagpur District Central Cooperative Bank amid uncertainty over inclusion in Maharashtra’s upcoming loan waiver scheme.
Adani Vidarbha: अदानी समुहानं विदर्भात केली मोठी गुंतवणूक! फडणवीसांनी सांगितलं विकासाचं टार्गेट

नागपूर जिल्हा बँकेतील 1200 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याने कर्जमाफी देतानाही याचा विचार केला जाणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. हे बघता नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकार वेगळा विचार करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या बँकेचे कर्जदार शेतकरी साशंक झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com