Nagpur Congress : लोकसभेचा यशस्वी फॉर्म्युला काँग्रेस विधानसभेला राबवणार

Nagpur Congress For Assembly Election : रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडूण आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांवर गृह जिल्हे सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेस सोपणार आहे.
Congress News
Congress NewsSarkarnama

Nagpur News, 8 July : रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडूण आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांवर गृह जिल्हे सांभाळण्याची जबाबदारी काँग्रेस सोपणार आहे. लोकसभेत यशस्वी झालेला हा फॉर्म्युला आता विधानसभा निवडणुकीत राबवला जाणार आहे.

रामटेक लोकसभेचा उमेदवार ठरवण्यापासून तर त्याला निवडूण आणण्याची संपूर्ण जाबादारी सावनेरचे माजी आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांनी घेतली होती. यामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले आहेत. केदार यांनी पक्षाच्या अधिकृत घोषणा व्हायच्या आधीच रश्मी बर्वे यांचे नाव जाहीर केले होते.

तत्पूर्वी जिल्हा काँग्रेसच्या (Congress) बैठकीत त्यांच्याच नावाचा ठराव करण्यात आला होता. यावरून स्थानिक नेत्यांमध्ये मोठा अंसोतष निर्माण झाला होता. रश्मी बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर केदार यांनी त्यांचेच पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली. यात एकाही काँग्रेसच्या नेत्यांनी हस्तक्षेप केला नाही.

भंडार-गोंदियाचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ठरवला होता. त्यांना विजयी करण्याची गॅरंटीसुद्धा घेतली होती. तुलनेत नवखे असलेल्या प्रशांत पडोळे यांनी नानांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे यांना पराभूत केले. नाना पटोले यांनी गडचिरोली आणि चंद्रपूरचेसुद्धा उमेदवार ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Congress News
Sharad Pawar : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात पवारसाहेबांचं शक्तिप्रदर्शन! 20 जुलैला देणार मोठा धक्का

प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांच्या नावाला सुरुवातीला विरोध झाला. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मुलीला येथून लढायचे होते. शिवानी वडेट्टीवार यांनी अनेक माध्यमांमध्ये जाऊन लढण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा लढायचीच हे आधीच ठरवून टाकले होते. त्यांचे पती बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार होते. नाना पटोले आणि प्रतिभा धानोरकर ठाम राहिल्याने वडेट्टीवारांना माघार घ्यावी लागली.

Congress News
NCP MLA Disqualification Case : शरद पवार गटानं वाढवलं राहुल नार्वेकरांचं टेन्शन, घेतली थेट सुप्रीम कोर्टात धाव,: हे ' आहे कारण

धानोरकर यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना पराभूत करून भाजपला मोठा धक्का दिला. गडचिरोलीच्या उमेदवारावरून कुठल्याच बड्या नेत्यांचा विरोध नव्हता. फॉर्म्युला यशस्वी झाल्याने विधानसभेतही हाच प्रयोग केला जाणार आहे. हे बघता एका नेत्यावर सहा ते बारा विधानसभा मतदारसंघ सांबाळण्याची जबाबदारी येणार आहे.

केदार यांना लढता आले नाही तरी रामटेक लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येणार आहे. विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर-गडचिरोली तर नाना पटोले स्वतः भंडारा-गोंदिया या जिल्ह्यात लक्ष घालणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com