Maharashtra Politics : देशातून संपत चाललेल्या पक्षाने महाराष्ट्रात दाखवली ताकद : राष्ट्रवादी, शिवसेनाही धोबीपछाड

बसपाचे राजकीय भवितव्य काय? अस्तित्व संपले, विश्वासहर्ता गमावली असे आरोप या राजकीय पक्षावर होत असतात.
Maharashtra BSP
Maharashtra BSPSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News BSP Politics : कधीकाळी उत्तर प्रदेशमध्ये राज्य केलेल्या आणि राष्ट्रीय राजकारणात दबदबा बनवलेल्या बसपाचे आजचे राजकीय भवितव्य काय? अस्तित्व संपले, विश्वासहर्ता गमावली असे आरोप या राजकीय पक्षावर होत असतात. काँग्रेस, रिपाइं, वंचित बहुजन आघाडी यांसारख्या पक्षांचे आव्हान असताना बहुजन समाज पार्टीने नगरपालिकेच्या निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील 11 जागा जिंकून आपली स्वतंत्र ओळख असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Maharashtra BSP
Congress reaction on Thackeray alliance : ठाकरे बंधूंच्या आरोपाशी सहमत, मात्र मुंबई महापालिकेत आघाडी नाही; वडेट्टीवारांनी स्पष्ट केली भूमिका

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत आयात उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याने बसपाकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते. भाजपची बी टीम म्हणूनही आरोप होत असतो. याच धोरणामुळे बसपाची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत बसपाच्या हत्तीवर लढणारा एकही उमेदवार पक्षात कायम राहिला नाही.

यातच बसपा कुठल्याही पदाधिकाऱ्याला डोक्यावर बसवतो आणि केव्हाही पक्षातून काढून टाकले असा अनुभव आजवर अनेकांना आला आहे. त्यामुळे आता बसपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाला जवळ केले आहे. आझाद यांच्या पक्षातील अनेक पदाधिकारी बसपातूनच आले आहेत. याशिवाय रिपब्लिकन पक्षाचे गटतट बसपाला आपला मानत नाहीत.

Maharashtra BSP
Vijay Mallya High Court : विजय मल्ल्याला हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका; भारतात कधी येणार? कोर्टाने नेमकं काय सुनावलं?

अशा विपरित परिस्थितीत बसपाने नगर पालिकेच्या निवडणुकीत भरीव कामगिरी केली आहे. ११ नगरसेवक निवडून आले आणि २२ उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे सेना, शिंदे सेना यांनाही बसपाने पछाडले आहे. त्यामुळे बसपाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. नागपूर महापालिकेत आता १० नगरसेवकांची संख्या २० करण्याचा प्रयत्न बसपाने सुरू केला आहे. मागील महापालिकेच्या निवडणुकीत बसपाचे १० नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे दोन व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. रिपाइंला खातेही उघडता आले नव्हते.

Maharashtra BSP
municipal elections : शरद पवारांच्या पक्षाने फुंकली ‘तुतारी’! महापालिकांसाठी मास्टरस्ट्रोक घोषणा

भाजपचे नेते आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी नगरपालिकेतून बसपाचे रमाताई नागसेन गजभिये, अभिलाषा विकास रंगारी, नीतेश कुमार यादव, गोंदिया येथील स्नेहा गडपायले, सुनील भरणे, तर वाडी नगरपालिकेतून विद्याताई वानखेडे, नरेंद्र मेंढे, राष्ट्रपाल वाघमारे, शालू मेश्राम, येरखेडा येथील विद्याताई, अनिल कुरील, निशिकांत टेंभेकर, अस्मिता गजबे, भिवापूर येथील प्रशांत घोरमोडे, शालू धनविजय, नरसिंह धनविजय यांनी बसपाच्या हत्तीला जिंवत ठेवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com