Nagpur Politics: नागपूर जिल्ह्यात युती तुटली, आघाडी फुटली; ‘स्थानिक'मध्ये गोंधळात गोंधळ

Nagpur Politics: नागपूर जिल्ह्यातील युती आणि आघाडी केल्या जाईल, समविचारी पक्षांना सोबत घेऊ निवडणूक लढू असे दावे नेत्यांमार्फत केले जात होत. मात्र ते फोल ठरले आहेत.
Congress , BJP
Congress , BJP Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics: नागपूर जिल्ह्यातील युती आणि आघाडी केल्या जाईल, समविचारी पक्षांना सोबत घेऊ निवडणूक लढू असे दावे नेत्यांमार्फत केले जात होत. मात्र ते फोल ठरले आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी नगरपालिका आणि नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.

भाजपने नागपूर जिल्ह्यातील सर्व २७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी नगराध्यक्षासाठी सर्वच्या सर्व उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेसने शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेला विचारले सुद्धा नाही. दोन पालिकेत त्यांनी पंजा गोठवला मात्र मित्रपक्षांना सोबत घेतले नाही.

Congress , BJP
Indurikar Maharaj: शरद पवारांच्या खासदाराकडून इंदुरीकरांची पाठराखण! म्हणाले, 'ते' कोट्यवधी रुपये खर्च करतात मग...

नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. गेल्या काही दिवसांपासून युती आणि आघाडीच्या चर्चा होत्या. मात्र कुठल्याच पक्षाने अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. शक्यतोवर आम्ही युती करू, मात्र याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले असल्याचे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांगत होते. कालपरवा त्यांनी युती करून लढू असेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. मात्र कोणाच्या भेटीगाठी,जागा वाटपावर चर्चा, बोलणी केली जात नसल्याने सर्वांच्याच युतीबाबत शंका होती. ती खरी ठरली आहे.

काँग्रेसने आधीपासूनच स्वबळाची तयारी केली होती. त्यांनी आपल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती आधीच घेऊन पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेनेला आम्ही स्वबळावरच लढणार असे अप्रत्यक्षपणे सांगून टाकले होते. मधल्या काळात काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी यांच्यात एक बैठक झाली. त्यावरून आघाडी होईल अशी आशा कार्यकर्त्यांना वाटत होती. मात्र ही निव्वळ भेटच ठरली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही.

Congress , BJP
Amedia Company: मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीवर सरकार मेहेरबान! स्टँपड्युटी प्रकरणी मुदतवाढ...

शिंदे सेनेच्यावतीने २७ पालिकांपैकी नगराध्यक्षपदासाठी १५ उमेदवार उभे केले आहेत. मोहपा आणि बुटीबोरीत पालिकेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आले नाही. या पालिकेत आमच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याचने शिवसेनेचे उपनेते आमदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.

अजित दादांच्या राष्ट्रवादीने सावनेर, मोहपा, कळमेश्वर, नरखेड, कामठी, कन्हान, कांद्री आदी ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. अनिल देशमुख आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी समविचारी पक्षासोबत बोलणी सुरू केली होती. त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. जिथे पक्षाचे बळ आहे, चांगले कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले असल्याचे कुंटे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com