Nagpur Politics: भाजप आमदाराच्या शाळेतच मतदान केंद्र; विरोधक म्हणतात, 'एखादं केंद्र घरीही...'

BJP MLA News : भाजप आमदार समीर मेघे कोषाध्यक्ष असलेल्या आणि त्यांचे वडील दत्ताभाऊ मेघे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या शाळेमध्ये निवडणूक आयोग व नागपूर जिल्हाधिकारी यांनी 7 मतदान केंद्र दिले आहे.
BJP MLA Sameer Meghe
BJP MLA Sameer MegheSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार समीर मेघे यांना पराभूत करण्यासाठी विरोधक अतिशय 'मायक्रो प्लॅनिंग' केले जात आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले जात आहे. त्यांना कुठल्या बुथवर सर्वाधिक मतदान होते याची आकडेवारी गोळा केली जात आहे. त्यातून त्यांचे एकेकाळचे सहकारी, माजी आमदार विजय घोडमारे यांनी मेघे यांच्या मालकीच्या शाळेत असलेले मतदान केंद्र हटवण्याची मागणी केली.

मात्र, निवडणूक विभाग फारशी दाद देत नसल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाला मेघे एवढेच प्रिय असतील तर त्यांच्या घरी एखादे मतदान केंद्र सुरू करावे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

भाजप (BJP) आमदार समीर मेघे कोषाध्यक्ष असलेल्या आणि त्यांचे वडील दत्ताभाऊ मेघे अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या शाळेमध्ये निवडणूक आयोग व नागपूर जिल्हाधिकारी यांनी 7 मतदान केंद्र दिले आहे. या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय घोडमारे यांनी निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

विशेष म्हणजे घोडमारे यांनी याच मतदारसंघातील बोगस मतदारांची नावे हटवण्याची मागणी केली होती. मतदारयादीत मेघे यांच्या कॉलेज, कार्यालयाची कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

BJP MLA Sameer Meghe
Siddharth Shirole : शिवाजीनगरमधील भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा; तो कसा? आमदार शिरोळेंनी सांगितला

वर्धा (Vardha) जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्य सावंगी येथील नागरिकांची नावेही हिंगणा मतदारसंघाच्या यादीत टाकण्यात आली असल्याचा आरोप घोडमारे यांचा आहे. या विरोधात न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहे.

न्यायालयाने निवडणूक आयोगाला मतदारयादीत सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे. एकाच मतदारसंघाचे दोन ठिकाणी असलेले नाव वगळण्यास सांगितले आहे.

BJP MLA Sameer Meghe
Mahayuti News : शिंदेसेनेनं वाढवलं भाजपचं टेन्शन, कराड 'उत्तर' मतदारसंघावर केला दावा

आमदार मेघे यांच्या शाळेत असलेले सात मतदान केंद्र कसे बेकायदेशीर आहे. उमेदवार तसेच उमेदवाराशी संबंधित कुठलीही व्यक्ती, संस्था, संघटनेच्या आवारात मतदार केंद्र राहू शकत नाही असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. हे निदर्शनास आणून दिल्यानंतरही निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाने यांनी मतदान केंद्र मेघेंच्या शाळेतून हटवण्यास नकार दिला आहे.

यावरून हिंगणा विधानसभेत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला निवडणूक आयोगाने व नागपूर जिल्हाधिकारी यांनीच तडा देत असल्याचा आरोप घोडमारे यांनी केला. संबंधित मतदान केंद्र हटवण्यास नकार दिल्याने लवकरच आपण लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा घोडमारे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com