Nagpur riots Update : ''नागपूर दंगलीतील आरोपी फहीमच्या जामीनाबाबत म्हणणे सादर करा'' ; कोर्टाने पोलिसांना बजावली नोटीस!

Faheem bail plea : फहीमविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला आहे. त्याला त्याच दिवशी अटकही करण्यात आली.
Faheem bail plea
Faheem bail pleasarkarnama
Published on
Updated on

Nagpur violence case : नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने नियमित जामीन मिळावा यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने याबाबत पोलिसांना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले. आहे. तत्पूर्वी फहीमने आपण निर्दोष असल्याचे सांगून राजकीय दबावामुळे फसवण्यात आल्याचा आरोप केला आहे.

नागपूरमध्ये(Nagpur) आठवड्याभरापूर्वी तुफान राडा झाला होता. औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दालाच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यास तुफान दगडफेक, जाळपोळ करून प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यामुळे सुमारे आठवडाभर नागपूरमध्ये तणावाची स्थिती होती. अनेक भागांमध्ये पोलिसांनी संचारबंदी लावली होती. ती आता उठवण्यात आली आहे.

Faheem bail plea
vidarbha Irrigation backlog : सिंचनाच्या अनुशेषावरून विदर्भात पुन्हा संघर्ष निर्माण होणार? कोर्टाने दिला मुख्य सचिवांना अल्टीमेटम!

तत्पूर्वी पोलिसांनी(Police) या प्रकरणी सुमारे १२०० लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. एकूण सहा जणांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात फहीम खान याचाही समावेश आहे. त्याला मुख्य आरोपी करण्यात आले आहे. त्याच्या घरावर महापालिकेच्यावतीने बुलडोजर चालवण्यात आला आहे. फहीम खान मॉयनॅरिट डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष आहे. लोकसभेची निवडणूकसुद्धा तो लढला होता. सध्या पोलिसांच्या कोठडीत असलेल्या फहीम खानने जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर आज सत्र न्यायाधीश आर. जे. राय यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

न्यायालयाने(Court) गणेशपेठ पोलिसांसह राज्य शासनाला नोटीस बजावली असून १ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. फहीमविरुद्ध गणेशपेठ पोलिसांनी १८ मार्च २०२५ रोजी देशद्रोहासह इतर विविध गंभीर गुन्ह्यांचा एफआयआर नोंदविला आहे. त्याला त्याच दिवशी अटकही करण्यात आली.

Faheem bail plea
Indrajit Sawant : प्रशांत कोरटकरच्या अटकेवर इंद्रजीत सावंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘अशा...’

तर मी निर्दोष असून मला या प्रकरणात राजकीय दबावामुळे फसविण्यात आले आल्याचे त्याने अर्जात नमूद केले आहे. मला कायदा व सुव्यवस्थेचा आदर आहे. त्यामुळे जामीन देण्यात यावा, अशी विनंती त्याने केली आहे. सरकारच्यावतीने ॲड. नितीन तेलगोटे यांनी नोटीस स्वीकारली. जखमी असलेला फहीम सध्या उपचार घेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. फहिमतर्फे ॲड. अश्‍विन इंगोले यांनी बाजू मांडली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com