Nagpur Riots Update : नागपूर दंगलप्रकरणी नवा ट्विस्ट, फहीम खानच्या चौकशीसाठी केंद्रीय पथक दाखल

Faheem Khan Latest News : फहीम खान याच्याविरोधात देशद्रोहासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तो गणेश पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Faheem Khan
Faheem Khansarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : औरंगजेबाची कबर हटवण्यावरून नागपूरमध्ये झालेल्या दंग्याने आता गंभीर वळण घेतले आहे. या संदर्भात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतल्यानंतर आता मुख्य आरोपीचे राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय कनेक्शन शोधल्या जात आहे. त्याला कोणाची फूस होती, कोणी प्रोत्साहित केले, याचा शोध घेण्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागाचे पथक नागपूरला दाखल झाले आहे. त्यामुळे या नागपूर (Nagpur) दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान याच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर राज्य शासनाने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्या घरावरसुद्धा बुलडोझर चालवण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) जयंतीच्या दिवशी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या दरम्यान औरंगजेबाच्या पुतळ्याचेसुद्धा दहन करण्यात आले होते. पुतळ्याच्या दहनासाठी कुराणाची आयात लिहिलली हिरवी चादर जाळण्यात आल्याने नागपूरमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती.

आंदोलनात प्रत्युत्तर देण्यासाठी हजार ते दोन हजाल लोकांचा जमाव अचानक धावून आला. त्यांनी तुफान दगडफेक केली. गाड्यांची तोडफोड केली. या राड्यात अनेक पोलिस अधिकारीसुद्धा जखमी झाले. रात्री बारा वाजताच्या सुमारास हंसापुरी भागत पुन्हा हाच प्रकार घडला. या घटनेने धार्मिक स्वरुप घेतल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी लावावी लागली होती.

Faheem Khan
Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट, तत्कालीन गृहमंत्र्यांनी केला मोठा दावा; म्हणाले, 'क्लोजर रिपोर्ट दिल्याने....'

अनेकांची धरपकड सुरू केली. सुमारे बाराशे लोकांवर गुन्हे दाखल केले. या दरम्यान बांगला देशातून सोशल मीडियावरून दंगलीत प्रोत्साहन दिल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सायबर क्राईम विभागाने अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सर्व घटनेच्या मागे मॉयनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फहीम खान असल्याचे निदर्शनास येताच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फहीम खान याच्याविरोधात देशद्रोहासह दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या तो गणेश पोलीस ठाण्याच्या कोठडीत असून जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने त्याला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान, गुन्हे शाखेने त्याला आपल्या ताब्यात घेतले असून येथेत केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकातर्फे त्याची चौकशी केली जात असल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com