Nagpur Mahayuti News: नागपूर ग्रामीणमध्ये राजकीय घडामोडींना वेग; भाजपला सोडून शिवसेना-राष्ट्रवादीच्या वाटाघाटी

Nagpur Politics : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विविध सामाजिक संघटना आणि छोट्या छोट्या पक्षांसोबत मोट बांधणे सुरू केले आहे. इच्छुकांकडून उमेदवारी अर्जही घेतले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने कोणाची वाट न बघता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी आटोपल्या.
Mahayuti Government
Mahayuti GovernmentSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात आता महायुती होण्याची शक्यता नाही. या दोन्ही निवडणुका तुम्हाला लढवायच्या आहेत. याचे नियोजन तुम्हीच करा असे स्पष्टपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगून टाकले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आता शिवसेनेकडून आशा आहे.

दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांनी एकमेकांची भेट घेऊन बैठक घेतली. यात भाजप विचारत नसेल तर आपली युती कायम राहील असे ठरवण्यात आले. या युतीत आणखी कोणाला घ्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता.9) पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीवर विचारविनिमय करण्यासाठी शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयात एक छोटेखानी बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश इटकेलवार, दुसरे जिल्हाध्यक्ष विनोद सातंगे, चंद्रहास राऊत, अमित कातुरे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता नाही. आम्हाला भाजपशी (BJP) युती तोडायची नाही. त्यांच्याही सोबत चर्चा करणार आहोत. मात्र, तिकडून प्रतिसाद मिळत नसेल तर आम्हाला आमची तयारी करावी लागणार असल्याचे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Mahayuti Government
Sangram Thopate News: संग्राम थोपटेंना भोरमध्ये मोठा धक्का; आमदार मांडेकरांनीही संधी साधली; म्हणाले,'जे नवीन भाजपात आले...'

आजची बैठक प्राथमिक होती. आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा त्या सर्वांना बोलावण्यात येईल. त्यात जे काही ठरेल त्यानुसार निवडणुकीला युती म्हणून आम्ही सामोरे जाऊ असे सांगण्यात आले.

दुसरीकडे काँग्रेसतर्फे महाविकास आघाडीबाबत कुठलाच प्रतिसाद दिला जात नाही. आजवर एकही चर्चा आपसात झालेली नाही. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांनी काँग्रेसवर दगाबाजीचा आरोप केला आहे. मागील जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोर उभे केले. त्यानंतर सन्मानाने त्यांना पक्षात घेतले. हे बघता बंडखोरी काँग्रेस पुरस्कृतच होती असाही आरोप कुंटे पाटील यांनी केला आहे.

Mahayuti Government
Parth Pawar Case : पार्थ पवार प्रकरण 'दिल्ली दरबारी'! काँग्रेसच्या खासदारांनं उचललं मोठं पाऊल, थेट PM मोदींनाच लिहिलं पत्र; केली 'ही' मोठी मागणी

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विविध सामाजिक संघटना आणि छोट्या छोट्या पक्षांसोबत मोट बांधणे सुरू केले आहे. इच्छुकांकडून उमेदवारी अर्जही घेतले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसने कोणाची वाट न बघता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी आटोपल्या. या मुलाखतीला पक्षाच्यावतीने ठरवलेल्या निवड मंडळालाही बोलावण्यात आले नव्हते.

माजी मंत्री सुनील केदार यांचेच समर्थक यात उपस्थित होते. याची तक्रार झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी ही बैठकच अवैध ठरवली आहे. हा सर्व ड्रामा बघता काँग्रेस आणि भाजप आघाडी आणि महायुतीमध्ये इतरांना घेण्यास इच्छुक नसल्याचे स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com