Shiv Sena Politics : शिंदेंची शिवसेना तोंडघशी, 5 माजी नगरसेवकांच्या न झालेल्या पक्षप्रवेशाची धक्कादायक माहिती समोर...

Minister Ashish Jaiswal Political News : माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह 10 माजी नगरसेवकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता.
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv Sena Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना, भाजप, काँग्रेस, बसपाच्या दहा माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्याचा मोठा गाजावाजा करणारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना दुसऱ्याच दिवशी तोंडावर आपटली. दहापैकी पाच नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेशच केला नसल्याचे सांगून आमच्या नावाचा वापर केला असल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे.

आम्ही शिंदे सेनेत प्रवेश केला हे वर्तमानपत्रातील बातम्यांमधूनच आम्हाला कळाल्याचे संबंधित नगरसेवकांनी सांगितले. यावरून शिंदे सेनेच किती अनागोंदी कारभार सुरू आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांच्यासह एकूण 10 माजी नगरसेवक व त्यांच्या समर्थकांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता.

Eknath Shinde Shiv Sena
Operation Sindoor Impact : ती 9 ठिकाणेच का? हल्ल्यांशी काय होता संबंध? गुप्तचर यंत्रणांनी मोहिम फत्ते केली...

प्रवेश केलेल्या काही नगरसेवकांचा फोटोही शिवसेनेच्यावतीने माध्यमांना पाठवण्यात आला होता. काही नगरसेवक व्यस्तता व वैयक्तिक कामांमुळे समारंभाला येऊ शकले नाही, असेही सांगण्यात आले होते. मात्र दुसऱ्या दिवशी पाच नगरसेवकांनी आम्ही शिंदे सेनेत प्रवेशच केला नाही, आमच्याशी कोणी चर्चा केली नाही आणि विचारणाही केली नसल्याचे सांगितले.

परसराम बोकडे, भास्कर बुरडे, भीमराव नंदनवार, जिजा धकाते आणि भाजपच्या माजी नगरसेविका दुर्गा रेहपाडे यांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे शिवसेनेसह राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचीही नाचक्की झाली आहे. जयस्वाल यांचे कट्टर समर्थक व माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी या पक्ष प्रवेशासाठी पुढाकार घेतला होता.

Eknath Shinde Shiv Sena
Operation Sindoor Live : 25 मिनिटांत 9 कॅम्प उध्वस्त; 2 महिला अधिकाऱ्यांनी VIDEO दाखवत सांगितली ऑपरेशन सिंदूरची ‘A to Z’ कहाणी...

दहा नगरसेवकांच्या पाठोपाठ आणि उद्धव सेनेचे आणखी तीन नगरसेवक लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही तळवेकर यांनी केला होता. नागपूर शहरातील माजी नगरसेवक असताना या प्रवेश समारंभाला शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, पूर्व विदर्भाचे संघटक यांना बोलावण्यात आले नव्हते. यावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर आणि माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यांनी मात्र शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com