Nagpur Congress News : महापालिका तिकिटावरुन राडा टाळण्यासाठी काँग्रेसचा नवा फॉर्म्युला: 'सुपर टीम' उतरवली मैदानात!

Nagpur Mahanagarpalika : मतदारसंघात सहा प्रभारी नियुक्त केले आहेत. या प्रभारीही संयुक्त बैठक शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली.
Nagpur Mahanagarpalika
Nagpur MahanagarpalikaSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मागील नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये मोठा राडा झाला होता. तिकीट कापण्यात आल्याने एक आमदाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. एबी फॉर्मसुद्धा पळवण्यात आले होते. या गोंधळाचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. या अनुभवातून काँग्रेस शहाणी झाली असल्याचे दिसून येत आहे. यावेळी खबरदारी म्हणून नागपूर जिल्हा प्रभारी रणजित कांबळे यांनी शहरातील सहा विधानसभा मतदारसंघात सहा प्रभारी नियुक्त केले आहेत. या प्रभारीही संयुक्त बैठक शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली.


निवडणूक जवळ येताच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारतो. प्रत्येकजण सक्रिय असतो. प्रत्येकाला लढायचे असते. यातून वाद निर्माण होतात. मागील निवडणुकीत शहरातील नेत्यांच्या एका गटालाच 100 तिकिटे देण्यात आली होती. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर निवडून येण्यापेक्षा एकमेकांना पाडण्यातच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खर्ची घातले होते. त्यामुळे मोठ्या पराभवाला काँग्रेसला सामोरे जावे लागले होते. या निवडणुकीत दीडशेंपैकी फक्त 29 नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले.

भाजपने विक्रम रचला. 108 नगरसेवक निवडून आणून सत्ता स्थापन केली. पूर्वी सर्व काही मुंबईत फायनल व्हायचे. उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्म पोहचायचे. पक्षाच्या जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या एबी फॉर्म दुसराच कोणी तरी पळवून न्यायाचा. यापासून काँग्रेसने बोध घेतला असल्याचे सध्यातरी दिसून येते.

Nagpur Mahanagarpalika
Scam Alert : ED समन्स आले तर घाबरू नका, आधी 'हे' काम करा! सगळा 'फर्जीवाडा' झटक्यात समजेल...

योग्य कार्यकर्त्याला तिकीट मिळावे आणि निवडणुकीचे नियोजन व्हावे यासाठी यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असल्याचे दिसून येते. याकरिता सहा विधानसभा मतदारसंघात सहा प्रभारी नेमले आहेत. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस शिवा शेट्टी, दक्षिण नागपूरमध्ये सरचिणीस मोहम्मद नदीम, पूर्व नागपूरमध्ये सरचिटणीस सतीश वारजूरकर, मध्य नागपूर आणि पश्चिम नागपूरमध्ये झिया पटेल आणि उत्तर नागपूरमध्ये सरचिटणीस किशोर बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Nagpur Mahanagarpalika
Pm Modi : पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना 'दिवाळी बोनस'; मोठा प्लॅन तयार, काही तासांत करणार घोषणा!

या संदर्भात शुक्रवारी झालेल्या बैठकीला विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, माजी महापौर, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नरेश गावंडे, दिनेश बानाबाकोडे, माजी नगरसेवक बंटी शेळके आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com