Congress Politics : भाजपची साथ सोडणाऱ्यांमध्ये आणखी एका माजी आमदाराची भर पडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. गोपालदास काँग्रेसमध्ये 13 सप्टेंबरला प्रवेश करणार आहेत.
विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा तर विधान परिषदेवर दोन वेळा गोपालदास अग्रवाल हे आमदार म्हणून विजयी झाले होते. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना गोपालदास म्हणाले, माझी घरवापसी झाली आहे. काँग्रेस परिवारामध्ये सामील झालो आहे. आता गोंदियावासीयांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार. गोंदियाच्या विकासाच्या दृष्टीने मोठं पाऊल टाकलं आहे. गोंदियाची जनता माझ्या निर्णयाच्या स्वागत करणार. गोंदियामध्ये काँग्रेस नक्की जिंकणार.
गोपालदास अग्रवाल हे 5 वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019 च्या निवडणुकीत गोपालदास यांचा पराभव झाला तर अपक्ष आमदार विजयी झाला होता.
गोपालदास म्हणाले, मी पाच वर्ष भाजपसोबत राहिलो. मात्र, सत्तेत असतानाही भाजपकडून गोंदियाचा विकास झाला नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच निर्णय घेतला. काँग्रेस प्रभारी चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये 13 सप्टेंबरला गोपालदास काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.