Nagpur Violence: दंगल घडविण्यास कारण ठरलेला फहिम खानचा Video पोलिसांच्या हाती; राजद्रोहाचा गुन्हा दाखल

Fahim Khan Sedition Charges Nagpur Violence: पोलिसांनी 172 व्हिडिओ पैकी 57 व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कलम 152 नुसार कारवाई केली आहे.
Nagpur Violence
Nagpur ViolenceSarkarnama
Published on
Updated on

नागपुरात झालेल्या हिंसाचाऱ्यानंतर पोलिसांनी समाजकंटकांच्या मुसक्या आवळ्यास सुरवात केली आहे. दंगल घडवण्यास प्रवृत्त करणारे 172 व्हिडिओ सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यात महत्वाचे म्हणजे एक व्हिडिओ हा अटक करण्यात आलेला आरोपी फहिम खान याचा आहे.

दंगल घडवण्यास कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची धरपकड करण्यास सुरवात केली आहे. फहिम खान हा दंगलीचा मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात शंभराहून अधिक युवकांना अटक करण्यात आली आहे.

Nagpur Violence
Rashmi Karandikar: महाराष्ट्रातील IPS अधिकारी अडचणीत; गुन्हे शाखेकडून दुसऱ्यांदा समन्स

डेमॉक्रॅटिक पार्टीचा नेता फहीम खान याचा चिथावणीखोर वक्तव्यातून युवक एकत्र आले, त्यानंतर त्यांनी हल्ला करण्यास सुरवात केल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. चिथावणीखोर भाषण करीत असतानांचा फहिम यांचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याची तपासणी सुरु आहे. सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली नागपूर पोलिसांनी सुरु केल्या आहेत.

पोलिसांनी 172 व्हिडिओ पैकी 57 व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कलम 152 नुसार कारवाई केली आहे. भारताचे सार्वभौमत्व धोक्यात आणण्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur Violence
Devendra Fadnavis: जयंतरावांना उत्तर देताना फडणवीसांनी केली राणेंची कानउघाडणी; सांगितला अटल बिहारी वाजपेयींचा राजधर्म

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी सुरु आहे. हिंदुत्वादी संघटनांनी निदर्शन केली आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाकडूनही आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दोन गटात हिंसाचार झाला. वाहन, घरांवर समाजकंटकांनी दगडफेक केली.सध्या येथील परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

दंगल उसळल्यावर अनेकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची माहिती समोर अली आहे. सायबर पोलिसांकडून १५७ व्हिडिओ तपासण्यात आले असून त्यातील ५७ व्हिडिओ पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com