Devendra Fadnavis: जयंतरावांना उत्तर देताना फडणवीसांनी केली राणेंची कानउघाडणी; सांगितला अटल बिहारी वाजपेयींचा राजधर्म

Devendra Fadnavis advice to Nitesh Rane:आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो....
Devendra Fadnavis advice to Nitesh Rane:
Devendra Fadnavis advice to Nitesh Rane:Sarkarnama
Published on
Updated on

भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे समाजात तेढ निर्माण होते, असा आरोप त्यांच्यावर विरोधकांनी केला आहे. राणेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी राणेंचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांना सल्ला दिला.

फडणवीसानी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली. वाजपेयींनी राजधर्म पाळण्याच्या दिलेल्या मंत्राची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना करून दिली.

एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत जयंत पाटील यांनी घेतली. त्यावेळी जयंतरावांनी विचालेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तरे दिली.नितेश राणे यांच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विधानाबाबत उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "‘तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे’ सल्ला त्यांनी राणेंना दिला.

Devendra Fadnavis advice to Nitesh Rane:
RSS ON Nagpur Violence: "आम्ही कुठल्याही हिंसेचे समर्थन करत नाही; RSSने विहिंपचे कान उपटले

आपल्या बोलण्यातून कुठेही तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. कधी-कधी तरुण मंत्री बोलून जातात. त्यांच्याशी मी संवाद करतो, त्यांना मी सांगतो. की आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही संयम बाळगूनच या ठिकाणी बोललं पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

त्यामुळे आपले विचार काय आहेत, आपल्याला काय आवडतं? काय आवडत नाही? हे बाजूला ठेवून आपण संविधानाची शपथ घेतली आहे. संविधानाने आपल्यावर कोणासोबतही अन्याय न करता वागण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मंत्र्यांनी बोलत असताना संयम पाळला पाहिजे, असे ते म्हणाले.

Devendra Fadnavis advice to Nitesh Rane:
Sanjay Mishra: भाजपचं धक्कातंत्र; जिल्हाध्यक्षांची खुर्ची पुसणारा त्याच खुर्चीवर झाला विराजमान!

फडणवीस यांनी यावेळी अटल बिहारी वाजपेयीच्या भूमिकेची आठवण करुन दिली. मंत्री म्हणून आपली एक भूमिका आहे, ज्याचा उल्लेख आदरणीय अटल बिहारी वाजपेयींनी केला होता. मंत्री म्हणून आपल्याला राज धर्म पाळायचा असतो, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com