Vidhan Bhavan latest updates: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल; नागपूरमध्ये पोहचताच उचलले मोठे पाऊल, सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली

Uddhav Thackeray: गुरुवारी चार वाजता विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असुन त्यामध्ये काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarama
Published on
Updated on

Nagpur News : नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस आहे. अधिवेशनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी दुपारी मुंबईवरून विधिमंडळात दाखल झाले. विधिमंडळात दाखल होताच त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नागपूरमध्ये पोहोचताच त्यांनी मोठी राजकीय चाल खेळली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकी दरम्यान ते आमदारांना काही महत्वपूर्ण सूचना करणार असल्याचे समजते. त्यासोबतच गुरुवारी चार वाजता विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असुन त्यामध्ये काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन तीन दिवसाचा कालावधी झाला आहे. यावेळी काही महत्वपूर्ण विषयवर सभागृहात चर्चा झाली आहे. मात्र, महत्त्वाच्या विषयाला सत्ताधाऱ्याकडून बगल दिली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यातच अधिवेशनाचा कमी असलेला कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचं पुढे आले आहे.

Uddhav Thackeray
Sanjay Shirsat Rajendra Janjaal dispute: शिरसाट-जंजाळ वादावर शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'! मध्यस्थी करत 'असा' काढला तोडगा...

त्यातच विधानसभा व विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेता निवडीच्या मागणीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेता निवडीचा निर्णय अध्यक्ष व सभापती घेतील, असे सांगून निवडीचा चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
BJP Politics : भाजपमध्ये अस्वस्थता! पक्ष निष्ठावंतांचा की आयात उमेदवारांचा? महापालिका निवडणुकीच्या रणनीतीमुळे चिंता वाढली

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी नागपुरात दाखल होताच सर्व सूत्रे हाती घेत लागलीच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची तातडीने बैठक बोलवली आहे. या बैठकी दरम्यान ते आमदारांना काही महत्वपूर्ण सूचना करणार असल्याने या बैठकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Eknath Shinde : सततच्या दिल्लीवारी अन् नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदेंचे मोठे भाष्य; म्हणाले, 'मोदी- शहा भेटीसाठी..'

दरम्यान, गुरुवारी दुपारी शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर गुरुवारी दुपारी चार वाजता ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार असुन त्यामध्ये काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Pathardi Politics : आमदार राजळेंच्या खेळीनं राष्ट्रवादीला हादरा; लढाईपूर्वीच अजितदादांच्या उमेदवाराची माघार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com