Nagpur Winter Session : बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत ठाकरे गटाच्या नेत्याची पार्टी; राणेंनी विधानसभेत झळकावला फोटो

Nitesh Rane Allegation : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर उठलेल्या लोकांसोबत हे उबाठा गटाचे लोक पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांचे शिवसैनिक.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

Nagpur News : मुंबईमध्ये १९९३ झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता, असा आरोप करत त्याबाबतचा फोटो भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज विधानसभेत झकळवला. त्यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली. या पार्टीची चौकशी करण्यात यावी. तसेच, त्याला कोणाचा आशीर्वाद होता, हेही पुढे आले पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली. (Thackeray group leader's party with bomb blast accused: Nitesh Rane )

मुंबईमध्ये झालेल्या १९९३ मधील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला. त्यात दोनशे लोकांचा जीव गेला होता. ज्यांनी बॉम्बस्फोट केले, त्या दाऊद इब्राहीमच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. मात्र, तो पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर होता. बाहेर असताना पॅरोलच्या शेवटच्या दिवशी तो शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता, त्याचे फोटो माझ्याकडे आहेत, असे सांगून आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बडगुजर यांचा सलीम कुत्ता याच्याबरोबर असलेला फोटो झळकवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nitesh Rane
Assembly Winter Session : पहिल्याच मिनिटांत जाधवांनी सरकारला चूक कबूल करायला लावले...फडणवीसांनीही मान्य केले...

त्या पार्टीचा व्हिडिओही माझ्याकडे आहे. तो मी तुमच्याकडे देणार आहे, असेही राणे यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. मुंबईत त्यावेळी शिवसेना भवनाबाहेरही बॉम्बस्फोट झाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर उठलेल्या लोकांसोबत हे उबाठा गटाचे लोक पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांचे शिवसैनिक, असा सवालही राणे यांनी उपस्थित केला.

त्या व्यक्तीला नुसतं अटक करू नका, तर त्याचा राजकीय गॉडफादर कोण आहे. त्याला कोण वाचवत आहे. बडगुजर कोणाच्या संपर्कात असतात, हे बडगुजर कोणाशी फोनाफोनी करतात, त्यांचा सीडीआर तपासला पाहिजे, अशी मागणी नीतेश राणे यांनी केली.

Nitesh Rane
Dharashiv Loksabha News : 'मित्रपक्षांना दावा करण्याचा अधिकार, मात्र 'धाराशिव'बाबत निर्णय नाही' ; राणाजगजितसिंह म्हणाले...

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत हे लोक पार्ट्या करायला लागेल तर आम्ही सुरक्षित आहोत का, असा माझा प्रश्न आहे. हे राज्यातील प्रमुख पक्ष आहेत. स्वतःला हिंदुत्वादी पक्ष समजतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस स्वतःला म्हणवतात आणि दाऊदच्या लोकांसोबत पार्ट्या करतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत आहेत. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करावी. त्या व्यक्तीचा राजकीय गॉडफादर कोण, हेही चौकशी निष्पन्न व्हावे, अशी मागणीही राणे यांनी विधानसभेत केली.

Nitesh Rane
Chhagan Bhujbal : मी फार मोठी लोकं अंगावर घेतलीत, तू किस झाड की पत्ती है! भुजबळांचे जरांगेना चॅलेंज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com