Maharashtra Congress : काँग्रेसमध्ये वाद उफाळला, विधानसभा पराभवाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच; वडेट्टीवारांनी डागली तोफ

Vijay Wadettiwar blames Nana Patole for Assembly election failures : लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय ज्यांनी घेतले, त्यांच्यावरच विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी येईल, असे सांगून वडेट्टीवार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टार्गेट केले आहे.
Nana Patole-Vijay Wadettiwar
Nana Patole-Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 13 December : महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा सध्या काँग्रेसमध्ये आहे. नव्या अध्यक्षाची चाचपणी करायला काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येत असल्याचे बोलले जात आहे. नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्षपद काढून घेतले जाईल, अशीही चर्चा सुरू आहे. या सर्व घडामोडींवर माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय ज्यांनी घेतले, त्यांच्यावरच विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी येईल, असे सांगून वडेट्टीवार यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना टार्गेट केले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते. त्याचे सर्व श्रेय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः घेतले होते. त्यामुळे सहाजिकच पराभवाची जबाबदारी त्यांच्यावरच येणार आहे. पराभवाची कारणे, चुका, नेतृत्वाविषयी मतं जाणून घेण्यासाठी प्रभारी रमेश चेन्निथाला नागपूरला येणार आहेत. ते सर्वांसोबत चर्चा करतील. या चर्चेतून जो सूर निघेल, त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, चर्चेत कोण सहभागी होतात, काय मत नोंदवतात यावरच सर्व निर्भर असल्याचेही ते म्हणाले.

Nana Patole-Vijay Wadettiwar
Ambadas Danve : अंबादास दानवेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप; थेट ऑडिओ-व्हिडिओ बाहेर काढण्याची धमकी

महाराष्ट्रात सध्या काँग्रेसचे फक्त १६ आमदार आहेत. त्यांच्या भरोशावर महाराष्ट्रात पुन्हा पक्ष उभारणे, बांधणी करणे मोठे आव्हान आहे. त्यामुळे पक्षाची धुरा कोणाच्या हातात द्यावी, याची चाचणी व चर्चा होणे आवश्यक असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले. हे सांगताना वडेट्टीवारांचा सर्व रोख आणि रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे होता.

पटोले यांना बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र लोकसभेत मोठे यश मिळाल्याने पटोले यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी विश्वास दर्शविला होता. त्यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढण्याचे निर्देशही राहूल गांधी यांनी दिले होते.

Nana Patole-Vijay Wadettiwar
Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंना मिळणार आवडीचे खाते; मात्र, महत्वाच्या मंत्रिपदावर सोडावे लागणार पाणी

दरम्यान महाविकास आघाडीतील जागा वाटपातील वाटाघाटी आणि काही महत्त्वाच्या जागा मित्र पक्षाला सोडण्यात आल्याने राहल गांधी यांनी पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. नंतरच्या बैठकांची जबाबदारी पटोले यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Edited BY : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com