Khadse Vs Mahajan: महाजन-खडसे पुन्हा भिडले; वळू, भाकड जनावरे अन् बरंच काही...

Maharashtra Assembly session 2023: गोजातीय विनिमन विधेयकावर चर्चा अन् वाद
Eknath Khadase and Girish Mahajan
Eknath Khadase and Girish MahajanSarkarnama

Maharashtra Assembly session 2023 : दूध उत्पादनासाठी कृत्रीम रेतन विषयक विधेयकावर आज (बुधवारी) पुन्हा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला.

दूग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन विनिमन विधेयक माडंले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे राजकीय विरोधक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात जुंपली.

मंत्री विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत विधेयक मांडल्यावर त्यावर खडसे यांनी चर्चेला प्रारंभ केला. त्यांनी या विधेयकाचे स्वागत करीत राज्याच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे अतिशय चागंले विधेयक आहे. त्याने दूग्धविकासाला चालना मिळेल.

Eknath Khadase and Girish Mahajan
Devendra Fadnavis : विदर्भाच्या प्रश्नांवरून फडणवीसांकडून विरोधकांची कानउघडणी

"आपल्या राज्यातील जे वळू संगोपन केंद्र आहेत, ते प्रत्येक कृषी विद्यापीठात सुरू करावे लागतील. त्यातून उत्तम प्रतीचे वळू तयार होतील. त्याने दूध उत्पादनाच्या वाढीला चालना मिळेल. हे करताना गल्लो-गल्ली जे सांड निर्माण झाले आहेत. मोकाट जनावरे आहेत, त्याने प्रदूषण होत आहे, त्यावर नियंत्रण गरजेचे आहे," असे खडसे हे बोलत असतानाच, मंत्री गिरीश महाजन सभागृहात दाखल झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यानंतर खडसे यांनी पुन्हा रेटून गल्लो-गल्ली असे वळू माजले. जे गल्लो-गल्ली सांड झाले, त्या सांडांमुळे प्रदूषण होते. त्याचा सगळ्यांना त्रास होतो. त्यावर महाजन उभे यांनी उभे राहून ‘सांड' तर आहेत, पण भाकड जनावरांचा देखील त्रास आहे’ असे सांगितले. त्यातून शाब्दीक वादाने वातावरण बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन, चंद्रकांत पाटील यांनी हस्तक्षेप करीत खडसे यांना तुम्ही जे मुद्दे मांडाल, त्याला ते लगेच उत्तर देतील. मात्र आज शेवटचा दिवस आहे. कामकाज खूप आहे. त्यामुळे त्याचा विचार करावा, असे सूचक विधान करीत, वातावरण शांत केले.

Edited by: Mangesh Mahale

Eknath Khadase and Girish Mahajan
Satej Patil News: सतेज पाटलांनी मनसुबे उधळले; मुख्यमंत्री येण्याआधीच डाव साधला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com