Kolhapur: कोल्हापूर शहरात अलीकडे थेट पाईपलाईन आणि धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून चांगलेच राजकीय नाट्य घडले. दोन्ही विकास कामावरून राजकीय श्रेयवादाची लढाई झालीच शिवाय मुत्सुदेगिरीने एकमेकांवर राजकीय गेम करण्याचे डाव सुरू झाले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यात अंतर्गत चांगलीच जुंपली असल्याचे चित्र आहे. या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्याची चर्चा आहे. मात्र ते येण्याआधीच आमदार सतेज पाटलांनी डाव साधला.
केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी एक प्रकारे धडपड सुरू असल्याचे चित्र कोल्हापुरात आहे. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपणच घ्यायला हवे हे मान्य आहे. पण अलीकडच्या काळात कोल्हापुरात अनेक विकास कामावरून एकमेकांवर राजकीय गेम सुरु झाले आहेत. आयत्या पिठावर रांगोळ्या ओढणाऱ्यांवर डाव साधत आमदार सतेज पाटील यांनी संधी साधली आहे. त्यात महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या कामांवरून सध्याच्या घडीला या तिन्ही पक्षातील लोकप्रतिनिधींची अंतर्गत श्रेयवादासाठी लढत असल्याचे चित्र आहे.
कोल्हापूर शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा बनलेल्या काळमवाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी आमदार सतेज पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ही योजना मार्गी लावली. कोल्हापूर महानगरपालिका कडून याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.
थेट पाईपलाईनचे श्रेय आमदार सतेज पाटील यांनी आपल्याच पथ्यावर पाडून घेतले आहे. काळमवाडी धरणातून पहिल्यांदा पाणी आल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात सतेज पाटील यांनी पाण्याचे स्वागत केले. तर भर दसरा चौकात नागरिक सत्कार आयोजित करून वचनपूर्ती सोहळा पार पडला. पण त्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ काही अंशी नाराज झाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना मंजूर झाली. ही योजना मार्गे लावण्यासाठी मुश्रीफ यांनी देखील वारंवार आढावा बैठका घेत पूर्णत्वास नेली. पण आमदार सतेज पाटील यांनी एकट्यांनीच याचे श्रेय घेतल्याने राष्ट्रवादींनेही थेट पाईपलाईन पाण्याची पूजन करून ही योजना पूर्ण करण्यासाठी आपलाही वाटा असल्याचे दाखवून दिले. पण अद्यापही महापालिकेने अधिकृत असा नियोजित कार्यक्रम जाहीर केला नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
चार दिवसापूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना पापाची तिकटी येथील धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला. यास मार्क जवळील काम अपूर्ण असल्याने महापालिकेने या सोहळ्यास नकार दिला होता. महापालिकेत आमदार सतेज पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्याची शक्यता होती. मात्र याचे श्रेय कोणाला जाऊ नये यासाठीच नियोजना आधीच लोकार्पण सोहळा केल्याची चर्चा आहे. झालेल्या या दोन घटनेमुळे यापुढेही श्रेय घेण्यासाठी असेच कार्यक्रम होत राहतील. यात काही नवल राहणार नाही.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.