Nagpur Zilla Parishad Election : रिपाई एकीकरणाला मोठा धक्का; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट स्वबळावर लढणार

RPI Ambedkar Group to Contest Independently: नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने सर्वच सर्कलमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nagpur Zilla Parishad Election
Nagpur Zilla Parishad ElectionSarkarnama
Published on
Updated on

Nagpur political news : महाविकास आघाडी आणि महायुतीत विखुरलेले रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटातटांना एकत्र आणून तिसरा पर्याय उभा करण्याचे प्रयत्न सुरू होता.

परंतु नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाने सर्वच सर्कलमध्ये स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रिपाई एकीकरणाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदेतील ५७ सर्कल आणि ११४ पंचायत समिती सर्कलमध्ये स्वतंत्र उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपासून गावोगावी आयोजित बैठकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी ‘स्वबळाचा नारा’ देत पक्षाची जनसंपर्क मोहीम जोमात सुरू ठेवली आहे.

पक्षाचे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या अलीकडील बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीत पक्षाच्या आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. ग्रामीण भागात पक्षाची संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना घराघरांत संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले, असे जिल्हाध्यक्ष दुर्वास चौधरी यांनी सांगितले.

Nagpur Zilla Parishad Election
Nilesh Lanke On Election Commission : 'मतचोरी झाली नसती, तर लोकसभेला देखील वेगळं चित्र असतं'; नीलेश लंकेंचा दिल्लीत मोठा दावा

सामाजिक न्याय, दलित, मागासवर्गीय, तसेच सर्वसामान्य शेतकरी (Farmers) व कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे बैठकीत ठरले. रिपब्लिकन पक्षाने गेल्या निवडणुकांतील अनुभवांच्या आधारे यंदा कोणत्याही मोठ्या पक्षाशी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समविचारी पक्ष सोबत आल्यास युतीचे दरवाजे उघडले आहेत. स्वबळावर लढून स्थानिक नेतृत्वाचा विकास आणि जनतेचा थेट विश्वास संपादन करणे हा पक्षाचा उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Nagpur Zilla Parishad Election
BMC Election : एकनाथ शिंदे-भाजप आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक : 22 शिलेदार मुंबईच्या मैदानात

जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये झालेल्या बैठकींना कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने पक्षाच्या यशाबाबत आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांची निवड, प्रचार आराखडा आणि मतदार संपर्क योजनेवर पक्षाने काम सुरू केले असून येत्या काही दिवसांत प्रचार मोहिमेला वेग येणार आहे, असेही दुर्वास चौधरी यांनी सांगितले.

तत्पूर्वी रिपाइं आठवले, रिपाइं कवाडे, रिपाई खोब्रागडे यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या यापूर्वी अनेक बैठका झाल्या आहेत. यावेळी सर्व रिपाइं गटाने एकत्रित लढण्याचे ठरवले होते. प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अधिकारी दिले असल्याचा दावा करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com