Nana Patole : अजितदादा-शिंदेंना दिलेली CM पदाची ऑफर अंगलट? काँग्रेसच्या पटोलेंचा काही तासांतच यु-टर्न; आता म्हणतात...

Nana Patole statement : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुलिवंदनाच्या दिवशी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना आपण मुख्यमंत्री बनवू अशी थेट ऑफर दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
Nana Patole, Eknath Shinde, Ajit Pawar
Nana Patole, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 15 Mar : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी धुलिवंदनाच्या दिवशी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना आपण मुख्यमंत्री बनवू अशी थेट ऑफर दिली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

महाराष्ट्रातील राजकारण पाहता नाना पटोलेंनी लवकरच भांडे वाजवले. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता खु्द्द नाना पटोले यांनी सारवासारव करत आपण केलेलं वक्तव्य गमतीने केल्याचं म्हटलं आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री बनवण्याच्या ऑफरवरील वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले, "काल होळीचा, धुलिवंदनाचा दिवस होता. आपापसातील सगळे मतभेद विसरून सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे. सध्या ज्या राजकीय घडामोडी सुरू त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हंटल होतं, 'बुरा ना मानो होली है' मी त्या विषयाला गमतीनं घेतलं आहे. मात्र, काही लोक ते सिरीयस घेत असतील तर, त्यांनी सिरीयस रहावं."

Nana Patole, Eknath Shinde, Ajit Pawar
Suresh Dhas : खोक्याच्या घरावर कारवाई करणाऱ्या वन विभागाबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "त्यांनी घाईघाईत..."

तसंच यावेळी त्यांनी आमच्यासाठी शेतकऱ्यांचा मुद्दा महत्वाचा असल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, शेतकऱ्यांना साधे विद्युत पंप मिळत नाहीत. तरुणांच्या हाताला काम नाही, महागाई आभाळाला टेकली असून राज्यावर कर्जाचा डोंगर वाढला आहे. या सगळ्यामुळे सर्वसामान्यांना जगणं मुश्किल झालंय ही काळजी काँग्रेसला (Congress) आहे.

जनतेच्या प्रश्नाला घेऊन चर्चा झाली पाहिजे. कालचा थट्टेचा दिवस होता मात्र आता थट्टा संपली आहे. त्यामुळे सरकारने जनतेच्या प्रश्नांना घेऊन समोर यावं, असं म्हणत त्यांनी काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि जनतेच्या प्रश्नांवर सिरीयस असल्याचं दाखवून दिलं. दरम्यान, यावेळी पटोले (Nana Patole) यांनी फडणवीस सरकारमधील 65 टक्के मंत्री भ्रष्टाचारी असल्याचंही वक्तव्य केलं.

Nana Patole, Eknath Shinde, Ajit Pawar
Aurangzeb Tomb Controversy : 'औरंगजेबा एवढंच फडणवीस सरकार क्रूर वागतंय'; हर्षवर्धन सपकाळांनी आणखी तेल ओतलं!

राज्यातील फडणवीस यांच्या सरकारमधील 65 टक्के मंत्र्यांवर विविध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. कितीतरी वॉशिंग मशिनमध्ये गेले आणि साफ होऊन आले आहेत, त्याच्यातले कितीतरी त्यांच्या आजुबाजूला बसतात. मग नॉर्मस् लावायचे आहे तर सगळ्यांना लावा. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करा ही आमची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com