Nanded BJP News : भाजपमध्ये फेरबदल ; आगामी निवडणुकीसाठी नांदेडमध्ये पक्ष बांधणीस सुरूवात..

Assembly elections : जेसीबीच्या सहाय्याने फुलांची आणि गुलालाची उधळण करण्यात आली.
BJP Latest News
BJP Latest NewsSarkarnama

Nanded : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर समोर ठेऊन भाजपने नांदेड जिल्ह्यात मोठे फेरबदल केले आहेत. नांदेड जिल्ह्यातील भाजप तालुकाध्यक्षांच्या निवडी जाहीर करून पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे. हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहुर या तालुका अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

BJP Latest News
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

हदगाव तालुका अध्यक्षपदी तातेराव पाटील, तर हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी गजानन चायल यांची निवड करण्यात आली आहे. गजानन चायल यांच्या निवडीनंतर हिमायतनगर शहरातून भाजपाच्या वतीने त्यांचे जलोषात स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या सहाय्याने फुलांची आणि गुलालाची उधळण करण्यात आली.

"गाव तिथे शाखा,घर तिथे कार्यकर्ता" असा माझा संकल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार हिमायतनगर तालुका भाजपमय करण्याचा निर्धार करणार असल्याचे नूतन तालुकाध्यक्ष गजानन चायल यांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

BJP Latest News
Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगेंनी दिल्लीही हलवली..; कौन है मनोज जरांगे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com