Nana Patole: नाना पटोलेंचं राजकारण संकटात... विधानसभेला घाम फोडणाऱ्या नेत्याला फडणवीसांची ताकद; विधानपरिषदेत दणक्यात एन्ट्री

Nana Patole, Avinash Brahmankar, Maharashtra Legislative Council: साकोलीत नाना पटोलेंना कडवी टक्कर देणारे अविनाश ब्राह्मणकर विधानपरिषदेत पोहोचले आहेत. फडणवीसांच्या पाठबळामुळे त्यांची राजकीय ताकद वाढल्याने पटोलेंसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole Politics: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत घाम फोडणारे अविनाश ब्राह्मणकर नुकतेच विधानपरिषदेवर निवडून आले आहेत. भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. ब्राह्मणकर यांच्या या विजायाने आता पटोले यांची धडधड वाढली आहे. 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पटोले यांच्यापुढे कदाचित पुन्हा ब्राह्मणकर यांचेच आव्हान असण्याची शक्यता आहे.

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या अनेक प्रमुख चेहऱ्यांना दारुन पराभवाचा सामना करावा लागला होता. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील आणि राजेश टोपे ही काही प्रमुख नावे आहेत. तर रोहित पवार आणि नाना पटोले यांना स्वत:ची सीट वाचवणे कठीण झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांना रोहित पवार यांच्या विरोधात ताकद देण्यासाठी विधानपरिषदेच्या सभापतीपदी बसवले. आता फडणवीसांनी आपला मोर्चा नाना पटोलेंकडे वळवला आहे.

Nana Patole
BJP Maharashtra : फडणवीसांच्या 'चाणक्य' नीतीने 'मविआ'ची धुळधाण; विधानपरिषदेत भाजपची ताकद सर्वोच्च शिखरावर

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले नाना पटोले यांचा साकोली विधानसभा मतदारसंघातून अवघ्या २०८ मतांनी निसटता विजय झाला होता. पटोलेंचे प्रमुख स्थानिक विरोधक मानले जाणाऱ्या ब्राह्मणकर यांनी पटोले यांना विजयासाठी शेवटच्या फेरीपर्यंत झुंजवले होते. या चुरशीच्या लढतीत ब्राह्मणकर यांना ९६,५८७ मते मिळाली होती. आता नाना पटोलेंना थोपवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी याच अविनाश ब्राह्मणकर यांना विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट देत निवडून आणत ताकद दिली आहे.

भंडारा-गोंदिया मतदारसंघातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर आणि ब्राह्मणकर यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत एकूण ४५७ मतदारांनी मतदान केले. यात ब्राह्मणकर यांनी ३०४ मते मिळवत ईश्वरकर यांचा तब्बल १५२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विधानपरिषदेत प्रवेश केला. नाना पटोले यांचे महायुतीसाठीचे उपद्रव मुल्य कमी करण्यासाठी फडणवीसांनी ब्राह्मणकर यांना विधानपरिषदेवर संधी देत त्यांचे हात बळकट केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Nana Patole
Solapur MLC Election : भाजपचा 500 पारचा नारा; तर पवारांच्या राष्ट्रवादीचा 318 मतांचा दावा

कोण आहेत अविनाश ब्राह्मणकर?

अविनाश ब्राह्मणकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांनी पंचायत समितीचे सदस्य, मोती दिघी जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काम पाहिले. याशिवाय, ते लाखनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकही राहिले आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ब्राह्मणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. ब्राह्मणकर यांनी नाना पटोले यांना त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com